

Amrita Rao Wedding: बॉलिवूडची (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री अमृता रावने (Actress Amrita Rao) अतिशय मोजक्या चित्रपटांमध्ये काम केले. पण तिने ज्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या तो चित्रपट हिट ठरला. 'विवाह' आणि 'मै हूं ना' या चित्रपटातील तिची भूमिका लक्षात राहण्यासारखी आहे. 'विवाह' चित्रपटामुळे तिला चांगली प्रसिद्धी मिळाली. ऐवढंच नाही तर तिच्या अभिनयाचे देखील खूप कौतुक करण्यात आले होते.
विवाह चित्रपटामध्ये शाहीद कपूरशी थाटामाटामध्ये लग्न करणाऱ्या अमृताने आपल्या खरा आयुष्यात मात्र अगदी साधेपणाने लग्न केले. आज अमृता राव आपला 42 वा वाढदिवस (Amrita Rao Birthday) साजरा करत आहे. अमृताच्या वाढदिवसानिमित्त आज आपण तिच्या लग्नाविषयी जाणून घेणार आहोत...
अभिनेत्री अमृता रावने आरजे अनमोलला (RJ Anmol) बरीच वर्षे डेट केल्यानंतर लग्न केले होते. त्यांच्या लग्नाला 9 वर्षे पूर्ण झाले आहे. नुकताच अमृता रावने आपल्या लग्नाबाबत एक खुलासा केला यामध्ये तिने आपल्या लग्नाला झालेल्या खर्चाबद्दल सांगितले. 9 वर्षांपूर्वी त्यांनी इस्कॉन मंदिरात गुपचूप लग्न केले होते.
एखाद्या कारच्या किमतीपेक्षा कमी खर्चात त्यांनी लग्न केले होते. त्यांच्या लग्नाला अवघे दीड लाख रुपये खर्च झाला होता. सामान्य माणसाच्या लग्नात यापेक्षा जास्त खर्च होतो. बॉलिवूडमधील सेलिब्रिटी धुमधडाक्यात शाही विवाह करतात पण अमृताने अगदी साध्या पद्धतीने लग्न केले होते. महत्वाचे म्हणजे या खर्चात दोघांच्या लग्नाच्या ड्रेसचाही समावेश होता.
एका यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये अमृता रावने लग्नाच्या खर्चाबद्दल सांगितले. अमृताने लग्नाच्या ठिकाणापासून दागिने, कपडे, खाण्यापिण्याची व्यवस्था यासाठीचा खर्च फक्त दीड लाख रुपये खर्च करुन केला होता. तिच्या लग्नाच्या साडीचीही किंमत फक्त 3,000 रुपये इतकी होती. तर मंगळसूत्राची किंमत फक्त 18,000 रुपये होती. याशिवाय अनमोलने परिधान केलेले कपडेही फारसे महाग नव्हते. लग्नाच्या ठिकाणाविषयी बोलायचे झाले तर, 11 हजार रुपयांना हे ठिकाण बुक करण्यात आले होते.
अभिनेत्रीच्या फिल्मी करिअरबद्दल सांगायचे झाले तर तिने 'अब के बरस'मधून फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. याशिवाय अमृताने 'इश्क विश्क', 'मस्ती', 'प्यारे मोहन', 'मैं हूं ना', 'विवाह', 'जॉली एलएलबी', 'सत्याग्रह' आणि 'ठाकरे' यासारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.
सध्या अमृता बऱ्याच काळापासून चित्रपट सृष्टीपासून दूर आहे आणि तिच्या वैयक्तिक जीवनाचा आनंद घेत आहे. अमृता रावने हिंदी चित्रपटसृष्टीत करिअर करण्यासाठी खूप संघर्ष केला आहे. पण 2006 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'विवाह' या चित्रपटाने तिला रातोरात स्टार बनवले होते. या चित्रपटामध्ये अमृता रावसोबत शाहिद कपूर मुख्य भूमिकेत होता. 2006 मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.