नॅशनल क्रश रश्मिका मंदानाचा वाढदिवस आहे.
अलिकडेच रश्मिका मंदानाने विजय देवरकोंडासोबत लग्नगाठ बांधली.
रश्मिका मंदाना साऊथ आणि बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
नॅशनल क्रश रश्मिका मंदानाचा (Rashmika Mandanna Birthday) उद्या (५ एप्रिल) ला वाढदिवस आहे. रश्मिका आता 30 वर्षांची झाली आहे. लग्नानंतर रश्मिकाचा हा पहिलाच वाढदिवस आहे. रश्मिकाचा जन्म कर्नाटकातील विराजपेट या छोट्याशा गावात झाला. नॅशनलने फक्त साऊथ इंडस्ट्री नाही तर बॉलिवूडही गाजवले आहे. रश्मिका मंदाना कायम आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिली. अनेक वर्षे डेट करून रश्मिका आणि विजयने 26 फेब्रुवारीला उदयपूरमध्ये लग्नगाठ बांधली.
रश्मिका मंदानाने आपल्या करिअरची सुरूवात २०१६ मधील कन्नड भाषेतील 'किरिक पार्टी' या रोमँटिक कॉमेडी चित्रपटातून केली. त्यानंतर रश्मिका मंदाना 'गीता गोविंदम' चित्रपटात विजय देवराकोंडासोबत दिसली. त्यांची जोडी सुपरहिट झाली. त्यानंतर २०२१ मध्ये रश्मिका मंदानाने 'पुष्पा: द राइज' मध्ये साऊथ अभिनेता अल्लू अर्जुनसोबत काम केले. यात रश्मिकाने श्रीवल्ली भूमिका निभावली. आपल्या अभिनयाने तिने अवघ्या जगाचे मन जिंकले. 'पुष्पा'मधील श्रीवल्ली भूमिका रश्मिका मंदान्नाच्या करिअरसाठी गेम-चेंजर ठरली. श्रीवल्लीचा साधेपणा, तिचे नृत्यकौशल्य आणि अल्लू अर्जुनसोबतची तिची जोडी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
मीडिया रिपोर्टनुसार, रश्मिका मंदानाची पूर्वी आर्थिक परिस्थिती खूप वाईट होती. रश्मिकाचे आई-वडील ज्यांच्याकडे आता करोडोची संपत्ती आहे. एकेकाळी रश्मिकासाठी खेळणी विकत घेण्याचेही पैसे त्यांच्याकडे नव्हते. आई-वडिलांना घर शोधण्यासाठी संघर्ष करावा लागला होता, त्यांच्याकडे भाडे देण्यासाठीही पैसे नव्हते. परिस्थिती इतकी बिकट होती. पूर्वी रश्मिका मंदानाच्या आई-वडिलांचा तिच्या करिअरसाठी विरोध होता. त्यानंतर आपल्या कामाने रश्मिकाने आई-वडिलांची समजूत काढली. रश्मिका मंदाना हे साऊथ इंडस्ट्रीतील खूप मोठे नाव आहे.
रश्मिका मंदानाने २०२२ मधील 'मिशन मजनू' या स्पाय थ्रिलर चित्रपटाद्वारे सिद्धार्थ मल्होत्रासोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर रश्मिकाने अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'गुडबाय' या चित्रपटात दिसली. त्यानंतर रश्मिका २०२३ मध्ये रणबीर कपूरसोबत 'ॲनिमल' मध्ये झळकली. तसेच २०२५ मध्ये विकी कौशलसोबत तिने 'छावा' चित्रपट केला. त्यानंतर सलमान खानसोबत 'सिकंदर' मध्ये दिसली.रश्मिका मंदानाचा मोठा चाहता वर्ग आहे. नॅशनल क्रशचे इन्स्टाग्राम 51.5 मिलियन फॉलोअर्स आहेत. त्याच्या एका स्माइलवर लाखो चाहते फिदा आहेत. मिडिया रिपोर्टनुसार, रश्मिका मंदान्नाची संपत्ती अंदाजे 66 कोटी रुपये आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.