Rashmika-Vijay Wedding : विजय देवरकोंडाच्या आईने सुनबाईंसाठी घातल्या ३ अटी, रश्मिका मंदाना पूर्ण करणार का? लग्नाआधी VIDEO चर्चेत

Rashmika Mandanna-Vijay Deverakonda Wedding : सोशल मीडियावर विजय देवरकोंडाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात विजय आपल्या भावी जोडीदाराविषयी आणि विजयची आई भावी सुनबाईविषयी बोलताना दिसत आहे.
Rashmika Mandanna-Vijay Deverakonda Wedding
Rashmika-Vijay Weddingsaam tv
Published On
Summary

रश्मिका-विजय 26 फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकणार आहेत.

विजय देवरकोंडाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात तो आपल्या भावी जोडीदाराविषयी बोलताना दिसत आहे.

विजयच्या आईने आपल्या भावी सूनेसाठी तीन खास अटी ठेवल्या आहेत.

लगीन घटिका समीप आली! रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांचे लग्न काही तासांवर येऊन ठेपले आहे. दोघेही लग्नाआधीच्या कार्यक्रमांचा आनंद घेताना दिसत आहेत. 'विरोश' (VIROSH) चे लग्न पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत. दोघांनीही आपल्या अभिनयाने साऊथ इंडस्ट्री गाजवली आहे. रश्मिका मंदाना आणि विजय देवराकोंडा यांनी ऑक्टोबर 2025 मध्ये हैदराबादमध्ये साखरपुडा उरकला. अशात आता विजय देवरकोंडाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात विजयच्या आईने भावी सुनबाईंसाठी एक अट ठेवलेली पाहायला मिळत आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये नेमकं काय?

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, विजय देवरकोंडाचे पालक, वडील गोवर्धन राव आणि आई माधवी त्यांच्या भावी सुनेविषयी बोलताना दिसत आहेत. 2018 मध्ये 'गीता गोविंदम' चित्रपटाला खूप यश मिळाले. त्यानंतर एका कार्यक्रमात विजयच्या आईला विचारण्यात आले की, तुम्हाला सून कशी हवी आहे? त्यावर उत्तर देत विजयची आई म्हणाली, "मला अशी सून हवी आहे जी माझ्या मुलाची चांगली काळजी घेईल. तिने त्याच्यावर निःस्वार्थ प्रेम करावे. तो इंडस्ट्रीमध्ये आहे, तर माझ्या माझ्या सुनेला त्याला समजून घ्यावे..."

सुनेबद्दल विजयचे वडील म्हणाले की, त्याला जी मुलगी आवडते तिच्याशी त्याने लग्न करावे. माझी कोणतीही अपेक्षा नाही. ना जातीशी ना धर्माशी. जर तो एखाद्या भारतीय विशेषतः दक्षिण भारतीय मुलीशी लग्न करेल तर मला आनंद होईल..." त्यानंतर विजय देवरकोंडा म्हणाला की, "मी लव्ह मॅरेज करेन...पण माझ्या पालकांना ती मुलगी आवडली पाहिजे..." 'गीता गोविंदम' चित्रपटात विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना झळकले आहेत.

विजय देवरकोंडा आता 36 वर्षांचा आहे. तर रश्मिका मंदाना आता 29 वर्षांची आहे. दोघे खूप वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहे. त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. रश्मिका-विजय 26 फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकणार आहेत. लग्नाचे रिसेप्शन 4 मार्चला थाटामाटात पार पडणार आहे. लग्न सोहळा आणि रिसेप्शन दोन्ही हैदराबादमध्ये होणार आहे. उदयपूर जवळील 'आयटीसी मेमेंटोस' या लग्जरी हॉटेलमध्ये त्यांचे लग्न होणार आहे.

Rashmika Mandanna-Vijay Deverakonda Wedding
Bigg Boss Marathi 6 : राखी, राकेश, प्राजक्ता की रोशन कोण घराबाहेर जाणार? 'या' नावाची तुफान चर्चा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com