Rapper Naezy News : "आयुष्य बरबाद झालं होतं"; 'गली बॉय'च्या शुटिंगवेळी कुठे होता? रॅपर नॅझीने केला मोठा खुलासा

Bigg Boss OTT 3 Rapper Nazey News : ‘आफत’ या गाण्याने नॅझीला चांगलीच प्रसिद्धी मिळाली आहे. नॅझी ‘गल्ली बॉय’ चित्रपटाच्या शुटिंगवेळी जेलमध्ये होता. त्या घटनेनंतर त्याच्या करियरला एक वेगळीच कलाटणी मिळाली, असं त्याने स्वत: सांगितले.
Rapper Naezy News : "आयुष्य बरबाद झालं होतं"; 'गली बॉय'च्या शुटिंगवेळी कुठे होता? रॅपर नॅझीने केला मोठा खुलासा
Bigg Boss OTT 3 Rapper Nazey NewsSaam Tv

'बिग बॉस ओटीटी ३' ची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. प्रत्येक स्पर्धक बिग बॉसच्या घरामध्ये आपल्या रियल लाईफबद्दल बोलताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून अरमान मलिक आणि त्याच्या दोन्हीही पत्नी सध्या कमालीच्या चर्चेत आहेत. अशातच आता रॅपर नॅझीही चर्चा सुरू झाली आहे. ‘आफत’ या गाण्याने नॅझीला चांगलीच प्रसिद्धी मिळाली आहे. नॅझी ‘गल्ली बॉय’ चित्रपटाच्या शुटिंगवेळी जेलमध्ये होता. त्या घटनेनंतर त्याच्या करियरला एक वेगळीच कलाटणी मिळाली, असं त्याने स्वत: सांगितले.

Rapper Naezy News : "आयुष्य बरबाद झालं होतं"; 'गली बॉय'च्या शुटिंगवेळी कुठे होता? रॅपर नॅझीने केला मोठा खुलासा
Kiran Mane Post : "खालच्या पातळीवरची टवाळी, पर्सनल चिखलफेक, अश्लील शिवीगाळ"; किरण मानेंची हार्दिक पंड्याच्या समर्थनात खणखणीत पोस्ट

बिग बॉसच्या घरात सना मकबुल, रणवीर शौरी आणि अरमान मलिकसोबत बोलत असताना नॅझीने ‘गली बॉय’ या चित्रपटाबाबत वक्तव्य केले आहे. तो म्हणतो, " ‘गल्ली बॉय’ हा चित्रपट माझ्या करियरवर बनत होता. ‘गल्ली बॉय’मुळे मी खूपच चर्चेत आलो असतो. पण नेमका मी त्या चित्रपटाच्या शुटिंग वेळीच गायब झालो. माझ्याबद्दल अनेक जणं विचारायचे. चित्रपटामध्ये जे काही दाखवले आहे, त्यापेक्षा मी रियल लाईफमध्ये फार आहे. चित्रपटानंतर अनेक लोकं माझ्याकडे नकारात्मक दृष्टीने बघू लागले."

रणवीरने नॅझीला विचारलं की, तू शुटिंग वेळी कुठे होतास ? त्यावर नॅझीने सांगितले की, "मी ‘गल्ली बॉय’च्या शुटिंगवेळी जेलमध्ये होतो. कारण मी त्या चित्रपटामुळे प्रसिद्ध होणार होतो, मी एक प्रसिद्ध रॅपर होणार होतो. त्यामुळे माझ्यावर काही खोटे आरोप करण्यात आले आणि मला एक वर्षासाठी जेलमध्ये टाकलं. माझ्या आई- वडिलांव्यतिरिक्त कोणालाच मी नक्की कुठे आहे, हे माहित नव्हतं."

Rapper Naezy News : "आयुष्य बरबाद झालं होतं"; 'गली बॉय'च्या शुटिंगवेळी कुठे होता? रॅपर नॅझीने केला मोठा खुलासा
Mirzapur 3 : "शुरू मजबूरी में किए थे, पर अब मजा आ रहा है"; 'मिर्झापूर ३'च्या रिलीजच्या आधीच चाहत्यांना मिळालं मोठं सरप्राइज

"या घटनेमुळे माझ्या आयुष्यामध्ये जितके चांगले घडले आहे, तितकेच वाईटही घडले आहे. मी माझ्या नातेवाईकांना परदेशात असल्याचे सांगितले होते. या घटनेमुळे माझं धुळीला मिळालं. या चित्रपटाने मला प्रसिद्धी दिली. या चित्रपटामुळे बॉलिवूडमध्ये माझी जागा निर्माण झाली." असं नॅझीने बिग बॉसच्या घरात सांगितले.

Rapper Naezy News : "आयुष्य बरबाद झालं होतं"; 'गली बॉय'च्या शुटिंगवेळी कुठे होता? रॅपर नॅझीने केला मोठा खुलासा
Rhea Chakraborty Birthday : रिया चक्रवर्तीचे रॉयल आयुष्य, महागड्या कार, आलिशान घर अन् कोट्यवधींची कमाई; पाहा नेटवर्थ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com