Kiran Mane Post : "खालच्या पातळीवरची टवाळी, पर्सनल चिखलफेक, अश्लील शिवीगाळ"; किरण मानेंची हार्दिक पंड्याच्या समर्थनात खणखणीत पोस्ट

Kiran Mane Shared Hardik Pandya Post : अभिनेते किरण माने यांनी खास हार्दिक पांड्यासाठी पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी हार्दिकचं चांगलंच कौतुक केलं आहे.
Kiran Mane Post : "खालच्या पातळीवरची टवाळी, पर्सनल चिखलफेक, अश्लील शिवीगाळ"; किरण मानेंची हार्दिक पंड्याच्या समर्थनात खणखणीत पोस्ट
Kiran Mane Shared Hardik Pandya PostSaam Tv

टीम इंडियाने टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या फायनल सामन्यात दक्षिण आफ्रिकेला ७ धावांनी पराभूत करत दुसऱ्यांदा विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. एकवेळ हा सामना दक्षिण आफ्रिका संघ जिंकणार असं सर्वांनाच वाटत होतं. पण त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी दमदार कामगिरी करत संघाला पराभवाच्या छायेतून बाहेर काढलं.

Kiran Mane Post : "खालच्या पातळीवरची टवाळी, पर्सनल चिखलफेक, अश्लील शिवीगाळ"; किरण मानेंची हार्दिक पंड्याच्या समर्थनात खणखणीत पोस्ट
Mirzapur 3 : "शुरू मजबूरी में किए थे, पर अब मजा आ रहा है"; 'मिर्झापूर ३'च्या रिलीजच्या आधीच चाहत्यांना मिळालं मोठं सरप्राइज

हार्दिक पांड्याने शेवटची ओवर टाकत भारताच्या विजयासाठी विशेष योगदान दिलं. क्रिकेटर हार्दिक पांड्या गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांमुळे ट्रोल होत आहे. पण टी- २० विश्वचषकच्या फायनलंतर हार्दिक पांड्याने स्वत:ची वेगळी प्रतिमा तयार केलेली आहे. अभिनेते किरण माने यांनी खास हार्दिक पांड्यासाठी पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी हार्दिकचं चांगलंच कौतुक केलं आहे.

Kiran Mane Post : "खालच्या पातळीवरची टवाळी, पर्सनल चिखलफेक, अश्लील शिवीगाळ"; किरण मानेंची हार्दिक पंड्याच्या समर्थनात खणखणीत पोस्ट
Rhea Chakraborty Birthday : रिया चक्रवर्तीचे रॉयल आयुष्य, महागड्या कार, आलिशान घर अन् कोट्यवधींची कमाई; पाहा नेटवर्थ

पोस्टमध्ये किरण माने यांनी लिहिलंय की, "अर्वाच्य शब्दांत 'ट्रोल' करणारे लोकं म्हणजे डुक्करपिलावळ आहे, असं मी नेहमी म्हणतो. कारण ते कायम द्वेषाच्या गटारात असतात. अफाट संघर्ष करून स्वत:ची ओळख निर्माण करू पहाणारी जिद्दी माणसं त्यांना खुपतात. त्यांना हे टार्गेट करतात. खालच्या पातळीवरची टवाळी, पर्सनल चिखलफेक, अश्लील शिवीगाळ करून ट्रोल करतात. हे ट्रोलर्स स्वत: नाकर्ते असतात.. पर्सनल लाईफमध्ये, कुटूंबियांच्याबाबतीत संपूर्ण अपयशी असतात. दुसर्‍यांनीही तसंच रहावं ही त्यांची अपेक्षा असते. मग मेहनती लोकांना ट्रोल करणे हा एकच उद्योग."

"त्या मेहनती माणसाला एखादेवेळी अपयश आलं, तो बरबाद होईल असे वाटलं, तर या जमातीला परमानंद होतो. भयान थयथयाट करतात. कुणाचे वाईट होणे, कुणी आयुष्यातून उठणे अशा गोष्टींमुळे आनंदी होणारे नीच लोक असतात हे ! त्यांना वाटते हा आपल्या जमातीसारखाच लेचापेचा, बुळगा असेल. आता खचून घरात बसेल, संपेल, आपण याला आणखी खचवूया. पण भावांनो... झुंझार, निडर, लढवय्या माणसाचा जिगरा जगावेगळा असतो. कुठल्याही कठीणातल्या कठीण परिस्थितीला भेदून वर येणारं रक्त असतं ते. पुन्हा पुन्हा गाडलं तरी उगवून येणारं बीज असतं. असे लोक मला 'माझीया जातीचे' वाटतात!"

Kiran Mane Post : "खालच्या पातळीवरची टवाळी, पर्सनल चिखलफेक, अश्लील शिवीगाळ"; किरण मानेंची हार्दिक पंड्याच्या समर्थनात खणखणीत पोस्ट
Kalki 2898 AD Collection : दीपिका-प्रभासच्या ‘कल्की २८९८ एडी’ची बॉक्स ऑफिसवर जादू, पहिल्या विकेंडमधील कमाईचा आकडा ३०० कोटीपार

"हार्दिक पंड्या हा ते 'बीज' ठरला! सोशल मीडियावरच्या ट्रोलर्सने त्याला छळ छळ छळलं. वैयक्तिक पातळीवर घसरुन अश्लील शिव्या दिल्या. सगळ्या भिकार टवाळांना सणसणीत बांबू लावून पाय रोवून हा वाघ उभा राहिला... भारताच्या विजयासाठी आपली सगळी ताकद पणाला लावली आणि काल वर्ल्डकपच्या इतिहासात स्वत:च्या नावाचा झेंडा रोवला! "माझ्या वाईट काळाचा आनंद घेणार्‍यांचा आनंद मी टिकू देणार नाही..." हे वाक्य त्यानं सार्थ करून दाखवलं." अशी पोस्ट किरण मानेंनी सोशल मीडियावर शेअर केली.

Kiran Mane Post : "खालच्या पातळीवरची टवाळी, पर्सनल चिखलफेक, अश्लील शिवीगाळ"; किरण मानेंची हार्दिक पंड्याच्या समर्थनात खणखणीत पोस्ट
Shatrughan Sinha : शत्रुघ्न सिन्हा रुग्णालयात का झाले दाखल? आजाराची माहिती आली समोर; सोनाक्षी-झहीरही पोहोचले हॉस्पिटलमध्ये

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com