Ind vs SA T20 WC Match Live Updates : टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला धूळ चारली; भारताचा ७ धावांनी विजय, पंतप्रधान मोदींकडून संघाचं कौतुक

Ind vs SA T20 WORLD CUP 2024 Live Updates : टी२०विश्वचषकाच्या फायनलमध्ये आज शनिवारी टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये सामना होत आहे. टी२० विश्वचषकाच्या इतिहासात टीम इंडिया दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याची संधी आहे. यामुळे साऱ्यांचं लक्ष या अंतिम सामन्याकडे लागले आहे.
विराटला मिळाली अक्षरची जोड! टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेसमोर ठेवलं मोठं आव्हान
Ind vs SA T20 WORLD CUP 2024 Live Updatessaam tv

Ind vs SA: टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला धूळ चारली; भारताचा ७ धावांनी विजय, पंतप्रधान मोदींकडून संघाचं कौतुक

बार्बाडोस येथे झालेल्या टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने रोमहर्षक विजय मिळवलाय. भारताने दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव केला. भारतीय संघाच्या विजयानंतर पंतप्रधान मोदींनी टीम इंडियाचं कौतुक करत त्यांचं अभिनंदन केलंय.

IND vs SA: अंतिम षटकात दक्षिण आफ्रिकेला जिंकण्यासाठी १६ धावांची गरज

IND vs SA: बुमराह चमकला! मार्को यान्सेनची उडवली दांडी; टीम इंडिया मजबूत स्थितीत

भारतीय संघ अडचणीत असताना पुन्हा एकदा जसप्रीत बुमराह मदतीला धावून आला आहे.

IND vs SA: दक्षिण आफ्रिकेचा अर्धा संघ तंबूत!

हेनरिक क्लासेन दक्षिण आफ्रिकेला कमबॅक करुन दिलं होतं. मात्र हार्दिक पंड्याने त्याला बाद करत माघारी धाडलं आहे.

IND vs SA: दक्षिण आफ्रिकेचं दमदार कमबॅक! क्लासेनच्या खेळीनं टीम इंडिया बॅकफूटवर

IND vs SA,Arshdeep Singh: टीम इंडियाचं दमदार कमबॅक! अर्शदीपच्या गोलंदाजीवर डीकॉकने धरली पॅव्हेलियनची वाट

भारतीय संघाला विकेटची गरज होती आणि अर्शदीप सिंगने क्विंटन डीकॉकला बाद करत माघारी धाडलं आहे.

IND vs SA : १० षटकअखेर दक्षिण आफ्रिका ३ गडी बाद ८१ धावा 

दक्षिण आफ्रिकेला हा सामना जिंकण्यासाठी ६० चेंडूत ९६ धावा करायच्या आहेत.

IND vs SA: फलंदाजीनंतर गोलंदाजीतही बापूची हवा! दक्षिण आफ्रिकेचे ३ फलंदाज पॅव्हेलियनमध्ये

दक्षिण आफ्रिकेने आतापर्यंत ९ षटकात ७१ धावा केल्या आहेत. अक्षर पटेलने स्टब्सला बाद करत दक्षिण आफ्रिकेला तिसरा मोठा धक्का दिला आहे.

IND vs SA:  दक्षिण आफ्रिकेला दुसरा धक्का! कॅप्टन मार्करम तंबूत

अर्शदीप सिंगने दक्षिण आफ्रिकेला दुसरा मोठा धक्का दिला आहे. कर्णधार मार्करम अवघ्या ४ धावांवर माघारी परतला आहे.

IND vs SA, LIVE: दक्षिण आफ्रिकेला पहिला धक्का! बुमराहच्या गोलंदाजीवर हेंड्रिक्सची बत्ती गुल

जसप्रीत बुमराहने हेंड्रिक्सला क्लीन बोल्ड करत माघारी धाडलं आहे. दक्षिण आफ्रिकेला पहिला धक्का बसला आहे.

IND vs SA, 1st Inning: विराटला मिळाली अक्षरची जोड! टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेसमोर ठेवलं मोठं आव्हान

या सामन्यात भारतीय संघाने १७६ धावा केल्या आहेत.दक्षिण आफ्रिकेला हा सामना जिंकण्यासाठी १७७ धावांची गरज आहे.

या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाकडून प्रथम फलंदाजी करताना रोहित शर्मा ९ तर रिषभ पंत शून्यावर माघारी परतला. त्यानंतर सूर्या ३ धावा करत माघारी परतला. त्यानंतर विराट कोहली आणि अक्षर पटेलने भारतीय संघाचा डाव सांभाळला. अक्षर पटेलने ४७ आणि विराट कोहलीने ७६ धावांची खेळी केली. शेवटी शिवम दुबेने२७ आणि हार्दिक पंड्याने ५ धावा केल्या.

Virat Kohli Wicket: विराटच्या शानदार खेळीला पूर्णविराम! टीम इंडिया मजबूत स्थितीत

विराट कोहलीने या सामन्यात शानदार खेळी करत भारतीय संघाला मजबूत स्थितीत पोहोचवलं आहे. मात्र तो ७६ धावा करत माघारी परतला आहे.

Virat Kohli Half Century: किंग कोहलीचा दरारा कायम! फायनलमध्ये झळकावलं अर्धशतक

विराट कोहलीने ४८ चेंडूंचा सामना करत आपलं अर्धशतक झळकावलं आहे.

Axar Patel Run out: क्विंटन डीकॉकचा शानदार थ्रो अन् अक्षर पटेल बाद

IND vs SA, Final: भारतीय संघाच्या १०० धावा पूर्ण

भारतीय संघाकडून अक्षर पटेल आणि विराट कोहलीने संघाचा डाव सांभाळला आहे. १४ व्या षटाकात भारतीय संघाने १०० धावा पूर्ण केल्या आहेत.

IND vs SA, Final: विराटला मिळाली अक्षरची जोड; 'बापू'कडून आफ्रिकन गोलंदाजांची झोडाझोड

भारतीय संघाला सुरुवातीला ३ मोठे धक्के बसले आहेत. मात्र अक्षर पटेल आणि विराट कोहलीने मिळून डाव सांभाळला आहे. भारतीय संघाने १० षटकअखेर ७५ धावा केल्या आहेत.

 IND vs SA, Final: भारतीय संघाकडून विराट कोहली अजूनही मैदानावर तळ ठोकून

भारतीय संघाने ५ षटकअखेर ४० धावा केल्या आहेत. विराट कोहली आणि अक्षर पटेल मैदानावर आहेत.

 IND vs SA, Final: दक्षिण आफ्रिकेकडून सापळा रचून सूर्याची शिकार! टीम इंडियाला तिसरा धक्का

 IND vs SA, Final: टीम इंडियाला दुसरा मोठा धक्का! रोहित पाठोपाठ रिषभ पंत तंबूत

भारतीय संघाला पहिल्याच षटकात चांगली सुरुवात मिळाली होती. मात्र दुसऱ्याच षटकात रोहित शर्मा आणि रिषभ पंतला केशव महाराजला बाद करत माघारी धाडलं आहे.

 IND vs SA, Final: भारतीय संघाला पहिला मोठा धक्का रोहित शर्मा ९ धावांवर बाद 

केशव महाराजच्या षटकात रोहितने शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र तो ९ धावांवर माघारी परतला आहे.

 IND vs SA, Final: विराटची दमदार सुरुवात

संपूर्ण स्पर्धेत विराट कोहलीची बॅट शांत होती. मात्र त्याने पहिल्याच षटकात मार्को यान्सेनला ३ चौकार खेचले आहेत. यासह १५ धावा जमा केल्या.

IND vs SA :  टीम इंडियाने जिंकला टॉस; आफ्रिकेसमोर ठेवणार मोठं आव्हान

रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. या सामन्यासाठी दोन्ही संघांच्या प्लेइंग ११ मध्ये बदल करण्यात आलेला नाही.

अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११

भारत- रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, रिषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग.

दक्षिण आफ्रिका- क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), रीझा हेंड्रिक्स, एडन मार्करम (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर,कागिसो रबाडा, ॲनरिक नॉर्टजे, तबरेझ शम्सी, मार्को जॅन्सन, केशव महाराज.

IND vs SA : भारत विरुद्ध द.आफ्रिका अंतिम सामना; थोड्याच वेळात होणार नाणेफेक

T20 विश्वचषकाच्या अंतिम सामना थोड्याच वेळात सुरू होणार. अर्ध्या तासात नाणेफेक केली जाणार आहे.

IND vs SA : या टी२० विश्वकपच्या स्पर्धेतील खास गोष्ट

टी २० विश्वचषकात भारत आणि दक्षिण आफ्रिका फक्त सहा सामन्यांमध्ये आमनेसामने आलेत. दोन्ही संघ सातव्यांदा एकमेकांसमोर आलेत. पहिले सहा सामने २००७ ते २०१२ दरम्यान खेळले गेलेत.

IND vs SA : भारत-दक्षिण आफ्रिका आमनेसामने; अंतिम सामन्यात अशी असेल दोन्ही संघाची संभाव्य टीम 

IND vs SA : भारत संभाव्य इलेव्हन:

रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराह .

दक्षिण आफ्रिका संभाव्य इलेव्हन:

क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), रीझा हेंड्रिक्स, एडन मार्कराम (कर्णधार), हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जेन्सेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, ॲनरिक नॉर्टजे, तबरेझ शम्सी.

T20 World Cup  IND vs SA: विराट कोहली खेळणार अंतिम सामना  

T20 वर्ल्ड कपमध्ये विराट कोहलीची कामगिरी साधरण राहिलीय. खेळलेल्या ७ सामन्यात केवळ ७५ धावा केल्यात. ही आकडेवारी कोहलीसारख्या खेळाडूला शोभत नाहीये. पण कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी त्याच्यावर विश्वास व्यक्त केलाय. किंग कोहली हा मोठे सामने खेळणारा खेळाडू आहे. त्याने अंतिम सामन्यासाठी आपली मोठी खेळी केलीय.

T20 World Cup IND vs SA : अंतिम सामन्यात कोण मारेल बाजी? दोन्ही संघ आहेत दमदार

या T20 विश्वचषकातील भारतीय संघ विजयाचा दावेदार संघ आहे. भारतीय संघाने एकही सामना गमावला नाहीये. तर दक्षिण आफ्रिकेच्या संघाचही या स्पर्धेत दबदबा दिसून आलाय. दोन्ही संघ अजिंक्य ठरलेत. मात्र गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आपल्या भूमीवर झालेल्या एकदिवसीय विश्वचषकात भारताने सलग दहा सामने जिंकले, मात्र अंतिम फेरीत त्यांना पराभव पत्करावा लागला. मात्र यावेळी संघाला अंतिम सामना जिंकून १३ वर्षांचा विजेतेपदाचा दुष्काळ संपवायचाय.

T20 World Cup 2024 IND Vs SA : नाणेफेक आहे महत्त्वाचं; ८ अंतिम सामन्यात टॉस जिंकणाऱ्या संघाने जिंकलाय सामना

T20 विश्वचषकाचे आतापर्यंत ८ फायनल झालेत. यामध्ये फक्त एकदाच नाणेफेक हरलेला संघ विजेता ठरला. तर ७ वेळा नाणेफेक जिंकणारा संघच चॅम्पियन ठरलाय. यामुळे आजच्या सामन्यात जो संघ टॉस जिंकेल तोच संघ विजेता बनू शकतो.

टी-२० विश्वचषकाचा नवा मानकरी कोण? भारत की दक्षिण अफ्रिका? आज होणार फैसला

टी-२० विश्वचषकाचा आज नवा मानकरी ठरणार आहे. आज होणाऱ्या भारत विरुद्ध दक्षिण अफ्रिकेमध्ये आज सामना होणार आहे. या सामन्यानंतर टी-२० विश्वचषकाचा मानकरी कोण? हे स्पष्ट होणार आहे. [

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com