Dipali Sayyed
BB Marathi 6 - Dipali Sayyed saam tv

BB Marathi 6 - Dipali Sayyed : दीपाली सय्यदच्या जवळच्या व्यक्तीचं निधन, बिग बॉसच्या घरात असलेल्या अभिनेत्रीला कल्पनाच नाही; नवरा म्हणाला...

Dipali Sayyed : 'बिग बॉस मराठी 6' मध्ये सध्या मराठी अभिनेत्री दीपाली सय्यद पाहायला मिळत आहे. दिपालीच्या कुटुंबातील एका जवळच्या व्यक्तीचे निधन झाले आहे. याची माहिती तिच्या नवऱ्याने दिली आहे.
Published on
Summary

दीपाली सय्यदच्या एका जवळच्या व्यक्तीचे निधन झाले आहे.

दीपाली सय्यदच्या नवऱ्याने याची माहिती दिली आहे.

दीपाली सय्यद 'बिग बॉस मराठी 6' मध्ये असल्यामुळे तिला याची माहिती नाही.

सध्या सर्वत्र 'बिग बॉस मराठी 6 ' ची चर्चा पाहायला मिळत आहे. गेले दीड महिना हा शो प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. घरातील सदस्यांना आपल्या कुटुंबाची आठवण येत आहे. बिग बॉसची स्पर्धक दीपाली सय्यद सुरुवातीपासून चांगला खेळ खेळताना दिसत आहे. प्रेक्षकांचे तिला खूप प्रेम मिळत आहे. अशातच आता एक वाईट बातमी समोर आली आहे. दीपाली सय्यदच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिच्या जवळच्या व्यक्तीचे निधन झाले आहे. याची माहिती तिच्या नवऱ्याने दिली आहे.

दीपाली सय्यदच्या नवऱ्याने म्हणजेच बॉबी खानने 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत एक दुःखद बातमी सांगितली आहे. मुलाखतीत दिलेल्या माहितीनुसार, अलिकडेच बॉबी यांच्या आईने निधन झाले आहे. म्हणजेच दीपाली सय्यदची सासू वारली. दीपालीचे तिच्या सासूसोबत खूप खास नाते होते. त्याच्यात माय-लेकीचे नाते होते. बॉबी म्हणाला, "माझी आई नेहमी दीपालीला बोलायची की, तू बिग बॉस जिंकल्यावर मी नक्की येईन..." दीपाली सय्यद बिग बॉसच्या घरात असताना तिच्या सासूचे निधन झाले आहे. त्यामुळे याची माहिती दीपालीला नाही.

बॉबी म्हणाले, "आम्ही तिला यातील काही सांगितले नाही कारण, घरात ती खूप चांगली खेळत आहे..." दीपाली सासू बाईंची आई सारखी काळजी घ्यायची. सासूबाई डॉक्टरकडे जाताना दीपाली त्यांच्यासोबत जायची. बॉबी यांनी सांगितले की, "माझी आई 2 फेब्रुवारीला वारली...मी दीपालीला खूप मिस करतोय...ती आता घरात आहे तिला हे समजले तर मोठा धक्का बसेल..."

जेव्हा शेवटी शेवटी बॉबी यांच्या आईने बोलणे बंद केले, तेव्हा ती लोक आईला दीपालीचा आवाज ऐकवायचे. या आधी देखील दीपालीची सासू दोन वेळा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती. शेवटी बॉबी म्हणाले," दीपाली आपल्या करिअरमध्ये कायम पुढे जावे अशी माझ्या आईची इच्छा होती..." दिपाली सय्यदच्या मुलाचे नाव अली सय्यद आहे. तो मुलाखतीत म्हणाला की, "घरातील सर्व आई आणि आजी पाहायची. आजी आणि आईचे नाते खूप खास होते. शेवटच्या क्षणी आजी पप्पा आणि आईलाच शोधत होती..."

Dipali Sayyed
Bigg Boss Marathi 6 : रितेश भाऊंनी घेतली राखी सावंतची बाजू; सचिनला सुनावले खडेबोले, नेटकरी भडकले|VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com