Actor Death: प्रसिद्ध अभिनेत्याचे वयाच्या ५३ व्या वर्षी निधन; दिर्घकालीन आजाराशी झुंज अपयशी, मनोरंजन विश्वावर शोककळा

Actor Death: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता एरिक डेन आता आपल्यात नाही. काही महिन्यांपूर्वीच त्यांना गंभीर आजाराचे निदान झाले होते. आता, त्यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण चित्रपटसृष्टीला धक्का बसला आहे.
hollywood actor eric dane passes Away
hollywood actor eric dane passes Away Saam Tv
Published On

Actor Death: हॉलिवूडमधून वाईट बातमी येत आहे. ज्येष्ठ अभिनेते एरिक डेनचे निधन झाले आहे. ते बऱ्याच काळापासून गंभीर आजाराशी झुंज देत होते. त्याच्या निधनाची बातमी त्याच्या कुटुंबासाठी, चाहत्यांना आणि संपूर्ण इंडस्ट्रीला मोठा धक्का आहे.

एरिक डेनचा मृत्यू कसा झाला?

एरिक डेन हॉलिवूडमधील सर्वात उत्तम अभिनेत्यांपैकी एक होता. त्याने केवळ त्याच्या अभिनयानेच नव्हे तर त्यांच्या देखण्या लूकनेही लाखो लोकांची मने जिंकली. पण, वयाच्या ५३ व्या वर्षी त्याने दुनियेचा निरोप घेतला. एरिक डेनचे निधन १९ फेब्रुवारी २०२६ रोजी झाले, असे त्याच्या कुटुंबियांनी चाहत्यांना सांगितले. पीपलच्या मते, अभिनेत्याचे अमियोट्रोफिक लॅटरल स्क्लेरोसिस (एएलएस) मुळे निधन झाले आहे.

hollywood actor eric dane passes Away
Famous Youtuber: प्रसिद्ध युट्यूबरच्या दोन्ही बायका एकाच वेळी प्रेग्नेंट; नेटकऱ्यांना बसला धक्का म्हणाले, 'हा पण ट्रेंड...'

एरिक डेनच्या मृत्यूची बातमी

एरिक डेनच्या कुटुंबाने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, "एएलएसशी धाडसी लढाईनंतर गुरुवारी दुपारी एरिक डेनचे निधन झाल्याची घोषणा आम्ही जड अंतःकरणाने करत आहोत. त्याने आपले शेवटचे दिवस प्रिय मित्र, त्याची पत्नी आणि त्याच्या दोन सुंदर मुली, बिली आणि जॉर्जिया यांच्याभोवती घालवले, जे त्याचे जग होते."

hollywood actor eric dane passes Away
Govinda: सुपरस्टार गोविंदा दिवाळखोर झाला? घटस्फोट आणि डाउनफॉलबद्दल आता भाच्याने केला मोठा खुलासा

गेल्या वर्षी, एरिक डेनने खुलासा केला की तो एएलएसशी झुंजत आहे, जो मेंदू आणि पाठीच्या कण्यातील मज्जातंतू पेशी (मोटर न्यूरॉन्स)ला घात करणारा एक न्यूरोडीजनरेटिव्ह आजार आहे.एरिक डेनने युफोरिया, द लास्ट शिप, ग्रेज अॅनाटॉमी आणि 'काउंटडाउन' सारख्या चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये काम केले. तो इंडस्ट्रीतील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com