Famous Youtuber: युट्यूबर-अभिनेता अरमान मलिकला कोणत्याही ओळखीची गरज नाही. तो विवाहित आहे आणि चार मुलांचा बाप आहे. लवकरच त्याच्या घरी पाचव्या बाळ येणार आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की अरमान हा एकमेव युट्यूबर नाही ज्याने दोनदा लग्न केले आहे आणि त्याच्या दोन्ही बायका एकाच वेळी प्रेग्नेंट राहिल्या आहेत? सनी राजपूतला हा देखील असाच एक युट्यूबर आहे, ज्याने अरमान मलिकप्रमाणेच दोनदा लग्न केले आहे आणि आता त्याच्या दोन्ही बायका प्रेग्नेंट आहेत आणि यासाठी त्याला खूप ट्रोल केले जात आहे.
दोन्ही बायका गर्भवती आहेत
सनी राजपूतची पहिली बायको रूप राजपूत आणि त्याची दुसरी बायको मानसी राजपूत आहे. सनी त्याच्या दोन्ही बायकांसोबत व्हिडिओ बनवतो आणि सोशल मीडियावर पोस्ट करतो. त्याच्या नुकत्याच आलेल्या व्हिडिओमध्ये सनीने खुलासा केला की त्याच्या दोन्ही बायका रूप आणि मानसी प्रेग्नेंट आहेत आणि त्या त्यांच्या गरोदरपणात एकमेकींची काळजी घेत आहेत. आता याला योगायोग म्हणा किंवा नियोजन म्हणा, पण दोन वर्षांपूर्वी अरमान मलिकच्या दोन्ही बायका पायल आणि कृतिका देखील एकत्र प्रेग्नेंट झाल्या होत्या.
युट्यूबरने पोस्ट केलेल्या व्हिडिओवर अनेक कमेंट आल्या असून युजर्स म्हणतात की सनी लोकप्रियता मिळवण्यासाठी अरमान मलिकची कॉपी करत आहे. एका युजरने व्हिडिओवर कमेंट करत म्हटले आहे की, "लाज वाटली पाहिजे." आणखी एका युजरने विचारले, 'दोन्ही बायका एकाच वेळी गर्भवती राहिल्या हे कसे शक्य आहे. एकाने म्हटले की, "तुम्ही कितीही कॉपी केली तरी तुम्ही कधीही ओजी अरमान मलिकसारखे होणार नाही." युजर्स सनीला अरमान मलिकचे स्वस्त व्हर्जन म्हणत आहेत. तर आणखी एकाने लिहिले हा पण ट्रेंड फॉलो करायचा आहे का आता?
सनी राजपूतचे युट्यूबवर ८७.७ हजार पेक्षा जास्त सबस्क्राइबर आहेत आणि इंस्टाग्रामवर ४८१ हजार फॉलोअर्स आहेत. सनीने युट्यूबवर 'ट्रुथ ऑफ टू वाइव्हज' नावाचा एक चित्रपट देखील रिलीज केला आहे. त्यात तो स्वतःची आणि त्याच्या दोन बायकांची कहाणी सांगतो. अरमान मलिकच्या कुटुंबाने सनी राजपूतवर त्याची कॉपी केल्याचा आरोप वारंवार केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.