Amitabh Bachchan Emotional In KBC 15: ‘आता बोलायची हिंमत होती नाही, पण...’; KBC 15च्या सेटवर बिग बींना रडू कोसळलं, Video Viral

Amitabh Bachchan Emotional Video: टेलिव्हिजन इंडस्ट्रितील लोकप्रिय टीव्ही शो 'कौन बनेगा करोडपती सीझन १५'चा काल (२९ डिसेंबर) शेवटचा एपिसोड टेलिकास्ट झाला आहे. यावेळी बिग बी शोची सांगता करत असताना ते भावूक झाले होते.
Amitabh Bachchan Emotional In KBC 15
Amitabh Bachchan Emotional In KBC 15Instagram
Published On

Amitabh Bachchan Emotional In KBC 15

टेलिव्हिजन इंडस्ट्रितील लोकप्रिय टीव्ही शो 'कौन बनेगा करोडपती सीझन १५'चा काल (२९ डिसेंबर) शेवटचा एपिसोड टेलिकास्ट झाला आहे. यावेळी बिग बी शोची सांगता करत असताना ते भावूक झालेले पाहायला मिळाले. अमिताभ होस्ट करत असलेला हा शो प्रेक्षकांचा निरोप घेतोय. शेवटच्या एपिसोडमध्ये अनेक बॉलिवूडच्या फेमस अभिनेत्रींनी उपस्थिती लावली होती. यावेळी अभिनेत्री शर्मिला टागोर, सारा अली खान, विद्या बालन केबीसीच्या मंचावर पोहोचले होते. शेवटच्या एपिसोडच्या शेवटची बिग बी भावुक झाले. (Bollywood)

Amitabh Bachchan Emotional In KBC 15
TRP Rating Of Marathi Serial: ‘ठरलं तर मग’ आणि ‘प्रेमाची गोष्ट’मध्ये चुरशीची लढत; इशा केसकरची ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ ‘या’ क्रमांकावर

त्यांचा हा भावूक झालेला व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ सोनी टेलिव्हिजनच्या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आलेला आहे. १५व्या सीझनच्या शेवटच्या एपिसोडमध्ये बिग बींनी आलेल्या पाहुण्यांबरोबर खूप गप्पा मारल्या. पण ज्यावेळी निरोप देण्याची वेळ आली तेव्हा अमिताभ बच्चन भावूक झाले. (Bollywood News)

निरोप देताना अमिताभ म्हणाले. "देवीयों और सज्जनो, आता आम्ही जात आहोत आणि उद्यापासून हा मंच सजणार नाही. मी उद्यापासून नाही आहे, हे आपल्या माणसांना सांगण्याची मला हिंमत नाही. किंवा हे बोलायची माझी इच्छा नाही. मी अमिताभ बच्चन, तूर्तास या स्टेजवरून तुम्हा सर्वांची रजा घेतोय. आणि एकदा शेवटचं म्हणतोय शुभरात्री", असं म्हणत अमिताभ यांच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्यांनी केबीसीच्या मंचाला निरोप दिला. (Social Media)

एप्रिल २०२३ पासून 'कौन बनेगा करोडपती सीझन १५'व्या सीझनला सुरूवात झाली होती. अमिताभ बच्चन यांनी मागील अनेक वर्ष हॉटसीटवर बसून लाखो प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. फक्त सामान्य व्यक्तीच नाही तर, अनेक सेलिब्रिटीही हॉटसीटवर बसले आहेत. त्यासोबतच इतर क्षेत्रातील मान्यवरही हॉटसीटवर बसले आहेत. अनेक स्पर्धकांना करोडपती होण्यासाठी प्रोत्साहन बिग बींनी दिलं आहे. यावेळी या मंचाला निरोप देताना बिग बी भावुक झाले. अमिताभ बच्चन केबीसीच्या आगामी सीझनचा भाग असणार की नाही, याविषयी अद्याप खुलासा केलेला नाही. (Entertainment News)

Amitabh Bachchan Emotional In KBC 15
Kareena Kapoor 2024 Resolution: करीना कपूर नवीन वर्षात काय संकल्प करणार? अभिनेत्रीने सोशल मीडियावरून केला खुलासा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com