TRP Rating Of Marathi Serial: ‘ठरलं तर मग’ आणि ‘प्रेमाची गोष्ट’मध्ये चुरशीची लढत; इशा केसकरची ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ ‘या’ क्रमांकावर

Marathi Serial TRP Report: डिसेंबर महिन्यातील तिसऱ्या आठवड्यातील टीआरपी चार्ट जाहीर झाला आहे. पहिल्या क्रमांकावर जुई गडकरीच्या ‘ठरलं तर मग’ मालिकेने बाजी मारली आहे.
TRP Rating Of Marathi Serial
TRP Rating Of Marathi SerialSaam Tv
Published On

TRP Rating Of Marathi Tv Serial 16th December To 22 December

मराठी टिव्ही इंडस्ट्रीमध्ये प्रेक्षकांसाठी नेहमीच वेगवेगळ्या धाटणीचे प्रयोग केले जातात. चित्रपटांप्रमाणेच मालिकांमध्येही त्याचा अवलंब केला जात असल्याचे आपल्याला दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक मालिकांमध्ये नवनवे वळण आलेले पाहायला मिळत आहेत. अनेक मालिकांचा ट्रॅक सुद्धा बदललेला आहे.

आलेल्या नव्या वळणांचा आणि बदललेल्या कथानकाचा इम्पॅक्ट आपल्याला मालिकेच्या टीआरपीमध्ये दिसतो. नुकताच डिसेंबर महिन्यातील तिसऱ्या आठवड्यातील टीआरपी चार्ट जाहीर झाला आहे. एक नजर टाकूया, यंदाच्या आठवड्यामध्ये कोणत्या मालिकेने टीआरपी चार्टमध्ये अव्वल क्रमांक पटकवला आहे. (Serial)

TRP Rating Of Marathi Serial
Kareena Kapoor 2024 Resolution: करीना कपूर नवीन वर्षात काय संकल्प करणार? अभिनेत्रीने सोशल मीडियावरून केला खुलासा

‘मराठी टीआरपी तडका’ या इन्स्टाग्राम पेजवरुन प्रेक्षकांना टीआरपीचे अपडेट मिळत असतात. नुकतंच या अकाऊंटवरुन डिसेंबर महिन्यातील तिसऱ्या आठवड्यातील टीआरपी चार्ट समोर आला आहे. १६ डिसेंबर ते २२ डिसेंबर दरम्यानचा टीआरपी चार्ट समोर आला आहे.

टीआरपी चार्टमध्ये पहिल्या क्रमांकावर जुई गडकरीची ‘ठरलं तर मग’ ही मालिका आहे. या मालिकेमध्ये तेजश्री प्रधानच्या ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेमध्ये चांगलीच चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. (Marathi Film)

यंदाच्या आठवड्यातही टीआरपी यादीमध्ये, ‘ठरलं तर मग’ ही मालिकाच सर्वश्रेष्ठ आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ही मालिका टीआरपी यादीमध्ये पहिल्या क्रमांकावरच आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका आहे. (Latest News)

तिसऱ्या क्रमांकावर ‘तुझेच मी गीत गात आहे’ ही मालिका आली आहे. तर चौथ्या क्रमांकावर ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ ही मालिका थेट चौथ्या क्रमांकावर पोहोचली आहे. ही मालिका अनेकदा दुसऱ्या क्रमांकावर आलेली पाहायला मिळत होती. (Entertainment News)

मालिकेला चाहत्यांकडून प्रतिसाद मिळत आहे. पण असं असलं तरी, मालिकेने टॉप ५ मधून आपले स्थान सोडलेले नाही. तर पाचव्या क्रमांकावर ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’, सहाव्या क्रमांकावर ‘आई कुठे काय करते’, तर सातव्या क्रमांकावर ‘कुण्या राज्याची गं राणी’ ही मालिका आहे. जसजसे मालिकेमध्ये नवे ट्वीस्ट अनुभवायला मिळतात, त्या प्रमाणेच टीआरपी यादीमध्येही आपल्याला बदल होताना दिसत आहेत. (Social Media)

TRP Rating Of Marathi Serial
Kareena Kapoor 2024 Resolution: करीना कपूर नवीन वर्षात काय संकल्प करणार? अभिनेत्रीने सोशल मीडियावरून केला खुलासा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com