Santosh Deshmukh Case: 'मन सुन्न करणारे...'; संतोष देशमुख प्रकरणावरुन 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम पृथ्विक प्रतापची संतप्त पोस्ट...

Santosh Deshmukh Case Reaction: बीड जिल्ह्यातील मस्साजोग या गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावर अनेक कलाकारांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून संताप व्यक्त केला आहे.
Santosh Deshmukh Case Reaction
Santosh Deshmukh Case Reactionsaam Tv
Published On

Santosh Deshmukh Case: बीड जिल्ह्यातील मस्साजोग या गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने गेले अनेक दिवस राज्यात वाद सुरू आहेत. अशातच काल संतोष देशमुख यांच्या हत्येचे दाहक फोटो समोर आले आणि संपूर्ण महाराष्ट्र हादरला. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांनी केलेले भिषण कृत्य समोर आल्यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या गुन्ह्याबद्दल सर्वच स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. या प्रकरणावर अनेक कलाकारांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून संताप व्यक्त केला आहे.

मारेकऱ्यांनी संतोष देशमुख यांच्यासोबत अमानवी कृत्य करून हत्या केल्यानंतर महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेता पृथ्विक प्रतापने संताप व्यक्त केला आहे. संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो व्हायरल झाल्यानंतर पृथ्विक प्रतापने संतप्त पोस्ट सोशल मिडीयावर शेअर केली आहे. "मन सुन्न करणारे, मन हेलावून टाकणारे संतापजनक फोटो...संतोष देशमुख यांना न्याय मिळायलाच हवा", असं त्याने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Santosh Deshmukh Case Reaction
Yuzvendra Chahal: धनश्री वर्मासोबत घटस्फोट झाल्यानंतर युजवेंद्र चहल पोहोचला बाबा निरालाकडे; व्हिडीओ व्हायरल

बीडचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी हत्या करण्यात आली. राज्यभरात या घटनेचे तीव्र पडसाद उमटत आहेत. याप्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली असून एक आरोपी अजूनही फरार आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे.

Santosh Deshmukh Case Reaction
Shakti Kapoor : शक्ती कपूरने जुहू अपार्टमेंट ६.११ कोटी रुपयांना विकला; जाणून घ्या अभिनेत्याला किती झाला नफा

संतोष देशमुख यांची सुदर्शन घुले आणि त्याचे सहकारी सुधीर सांगळे, प्रतिक घुले आणि फरार आरोपी यांच्याकडून निवस्त्र मारहाण करण्यात आली होती. या तिघांच्या मारहाणीतच संतोष देशमुख यांचा मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com