Arun Govil Fees: १९८७ मध्ये सर्वाधिक मानधन घेणारे 'श्रीराम'! २०२६ च्या 'रामायण'साठी अरुण गोविल यांनी किती फी घेतली?

Arun Govil Fees: रामानंद सागर यांच्या 'रामायण'मध्ये श्रीराम साकारणारे अरुण गोविल आता नितेश तिवारींच्या 'रामायण'मध्ये राजा दशरथाच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्या मानधनातील मोठी वाढ जाणून घ्या.
Arun Govil Fees
Arun Govil FeesSaam Tv
Published On

Arun Govil Fees:  रामानंद सागर यांच्या गाजलेल्या 'रामायण' मालिकेत प्रभू श्रीरामांची भूमिका साकारून घराघरात लोकप्रिय झालेले ज्येष्ठ अभिनेते अरुण गोविल पुन्हा एकदा 'रामायण'चा भाग बनत आहेत. मात्र, यावेळी ते प्रभू श्रीराम नव्हे, तर राजा दशरथ यांच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहेत. या नव्या भूमिकेसोबतच त्यांच्या मानधनाचीही मोठी चर्चा रंगली आहे.

१९८७ मध्ये दूरदर्शनवर प्रसारित झालेल्या रामानंद सागर यांच्या 'रामायण' मालिकेने भारतीय दूरचित्रवाणीच्या इतिहासात नवा विक्रम रचला होता. त्या काळात मालिकेच्या एका भागाचा निर्मिती खर्च सुमारे ९ लाख रुपये असल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे, या मालिकेतील सर्व कलाकारांमध्ये अरुण गोविल हे सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेते होते. News18 च्या वृत्तानुसार, श्रीरामांच्या भूमिकेसाठी त्यांना सुमारे ४० लाख रुपये मानधन देण्यात आले होते.

Arun Govil Fees
Actress Death: सिनेसृष्टीला मोठा धक्का! प्रसिद्ध अभिनेत्रीचे ब्रेन स्ट्रोकमुळे निधन, कुटुंबाने ४ महिने लपवली बातमी

आता दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या 'रामायण' चित्रपटात अरुण गोविल राजा दशरथाची भूमिका साकारत आहेत. हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात महागड्या सिनेमांपैकी एक आहे. त्याचे बजेट ४,००० कोटी रुपयांहून अधिक असल्याचे वृत्त आहे. Siasat च्या अहवालानुसार, या चित्रपटासाठी अरुण गोविल यांना सुमारे २.५ कोटी रुपये मानधन मिळत आहे.

Arun Govil Fees
Shakira: फेमस पॉप क्वीन शकिरा भारत दौऱ्यावर? मुंबईसह पुण्यात लवकरच रंगणार म्युझिकल कॉन्सर्ट

१९८७ च्या मालिकेपासून २०२६ च्या चित्रपटापर्यंत अरुण गोविल यांच्या मानधनात मोठी वाढ झाली आहे. मात्र, या चित्रपटातील प्रमुख कलाकारांच्या तुलनेत त्यांचे मानधन कमी असल्याचेही सांगितले जात आहे. तरीही, श्रीरामाची भूमिका साकारल्यानंतर आता राजा दशरथाच्या भूमिकेत त्यांना पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

दरम्यान, 'रामायण' हा चित्रपट दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार आहे. पहिला भाग यंदाच्या दिवाळीत, तर दुसरा भाग पुढील वर्षी दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटात रणबीर कपूर प्रभू श्रीराम, साई पल्लवी माता सीता, यश लंकेश रावण आणि सनी देओल प्रभू हनुमान यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. तसेच कुणाल कपूर इंद्रदेवाची भूमिका साकारत असून, ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी जटायू या महत्त्वाच्या पात्राला आवाज दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com