Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांची अचानक तब्येत बिघडली; काही दिवसांसाठी घेतलाय ब्रेक, पोस्टने चाहत्यांची वाढली चिंता

Amitabh Bachchan Health Update : बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून आपले हेल्थ अपडेट चाहत्यांना दिले आहे. पोस्टमुळे चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालेय.
Amitabh Bachchan Health Update
Amitabh BachchanSAAM TV
Published On: 
Summary

अमिताभ बच्चन यांची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

बिग बींच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती

अमिताभ बच्चन यांनी घेतला ब्रेक

बॉलिवूडचे महानायक गेल्याकाही काळापासून आपल्या हेल्थमुळे चांगलेच चर्चेत आहेत. अभिनेते अमिताभ बच्चन सोशल मीडियावर खूर सक्रिय असतात. वेगवेगळ्या विषयांवर आपली मते मांडताना दिसतात. नुकतीच त्यांनी एक पोस्ट 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) शेअर केली आहे, ज्यामुळे त्यांच्या प्रकृतीबद्दल चाहते चिंता व्यक्त करताना दिसत आहेत.

'बिग बी' अमिताभ बच्चन यांनी काल म्हणजे बुधवारी (२१ - १० -२६) ला 'एक्स' पोस्ट केली. त्यांनी सांगितले की, त्यांना विश्रांती घेण्याचा आणि आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मात्र त्यांना नेमकं झालं काय, विश्रांती घेण्यामागचे नेमके कारण त्यांनी स्पष्ट केलेले नाही. त्यांच्या पोस्टवर चाहते कमेंट्स करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस करताना दिसत आहेत.

अमिताभ बच्चन यांची पोस्ट

"क्षमस्व... मला माफ करा; मला काही दिवस विश्रांती घेऊन प्रकृती सुधारण्यासाठी वेळ काढण्याचा सल्ला देण्यात आला आहे, त्यामुळे मी सध्या काहीही लिहू शकत नाही..."

Amitabh Bachchan Health Update
Tiger Shroff Firing : बॉलिवूडमध्ये खळबळ! टायगर श्रॉफच्या शूटर्सच्या निशाण्यावर कपूर घराण्याची 'ही' व्यक्ती, घराची केली होती रेकी

अमिताभ बच्चन यांची ही पोस्ट अशा वेळी आली आहे, जेव्हा टायगर श्रॉफच्या गाडीवरील गोळीबार प्रकरणामुळे संपूर्ण बॉलिवूड हादरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी टायगर श्रॉफआधी बॉलिवूडच्या अनेक बड्या कलाकारांना टार्गेट केले. यात सलमान खान, अमिताभ बच्चन, अक्षय कुमार आणि आमिर खान यांच्या नावांचा समावेश आहे. हल्लेखोरांनी टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार करण्याआधी या कलाकारांची घराची रेकी केली होती. परंतु त्यांच्या घराचा कडक बंदोबस्त पाहून हल्लेखोरांनी प्लान बदलला.

आरोपींनी ज्या ठिकाणांची पाहणी केली होती, त्यांचे फोटो आणि व्हिडिओ त्यांनी गँगस्टर अनिल पंडित याच्यासोबत शेअर केले होते. अनिल पंडित हा लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित असल्याचे सांगितले जाते. आरोपींनी पुढील पाऊल उचलण्याबाबत त्याच्याकडून मार्गदर्शनही मागितले होते. या गोळीबाराच्या घटनेचा तपास सध्या पोलीस घेत आहेत.

अमिताभ बच्चन वर्क

अमिताभ बच्चन 'वेट्टैयन' (Vettaiyan) या चित्रपटात दिसले होते. लवकरच ते 'कल्की २८९८ एडी' या चित्रपटाच्या सीक्वलमध्ये दिसणार आहेत. तसेच 'बिग बी' 'कौन बनेगा करोडपती १८' या लोकप्रिय शोचे होस्टिंग करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com