Amitabh Bachchan: ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना हायकोर्टात हजर राहण्याचे आदेश, ४ वर्षांपूर्वीचं प्रकरण काय?

Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन यांच्या व्यक्तिमत्त्व अधिकार प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने महत्त्वाचे आदेश दिले आहेत. पुढील सुनावणी १६ नोव्हेंबरला होणार असून यावेळी अमिताभ बच्चन यांना हायकोर्टात हजर राहण्यास सांगितले आहे.
Amitabh Bachchan
Amitabh BachchanSaam Tv
Published On: 

Amitabh Bachchan: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्याशी संबंधित एका जुन्या खटल्यात दिल्ली उच्च न्यायालयाने महत्त्वाचे आदेश दिले आहेत. व्यक्तिमत्त्व अधिकारांच्या संरक्षणासाठी दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने अमिताभ बच्चन यांना प्रत्यक्ष हजर राहण्यास सांगितले आहे. या प्रकरणात काही प्रतिवादींसोबत तडजोड झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, काही व्यावहारिक अडचणींमुळे तडजोडीच्या कागदपत्रांवर अधिकृत स्वाक्षरी होऊ शकलेली नाही. त्यामुळे न्यायालयाने पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.

पुढील सुनावणी १६ नोव्हेंबरला

एएनआयच्या वृत्तानुसार, न्यायमूर्ती पुरुषेंद्र कुमार कौरव यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी केली. अमिताभ बच्चन यांना तडजोडीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वेळ देण्यात आला असून पुढील सुनावणी १६ नोव्हेंबर रोजी होणार आहे.तडजोडीची प्रक्रिया पूर्ण झाली नाही आणि अमिताभ बच्चन यांना खटला पुढे चालवायचा असेल, तर प्रत्यक्ष न्यायालयात उपस्थित राहावे लागू शकते. असे या प्रकरणातील पुढील कार्यवाहीबाबत निर्देश दिले आहेत.

Amitabh Bachchan
Salman Khan: बॉलिवूडचा भाईजान आता यूट्यूबवर! सलमान खानने सुरू केलं यूट्यूब चॅनेल, चाहत्यांसोबत शेअर केला पहिला खास व्हिडीओ

काय आहे व्यक्तिमत्त्व अधिकारांचे प्रकरण?

अमिताभ बच्चन यांनी २५ नोव्हेंबर २०२२ रोजी दिल्ली उच्च न्यायालयात व्यक्तिमत्त्व अधिकारांच्या संरक्षणासाठी याचिका दाखल केली होती. त्यांच्या नावाचा, फोटोंचा, आवाजाचा आणि ओळखीचा परवानगीशिवाय वापर केला जात असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला होता. काही व्यक्ती त्यांच्या लोकप्रियतेचा गैरफायदा घेऊन व्यावसायिक लाभ मिळवत असल्याचा युक्तिवाद याचिकेत करण्यात आला होता. विशेषतः लॉटरीशी संबंधित उपक्रमांमध्ये त्यांच्या नावाचा वापर होत असल्याचा मुद्दा अमिताभ बच्चन यांचे वकील हरीश साळवे यांनी मांडली होती.

Amitabh Bachchan
Famous Actor Arrested: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला मुंबई पोलिसांनी घेतलं ताब्यात

२०२२ मध्ये न्यायालयाने दिला होता अंतरिम आदेश

या प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने २०२२ मध्ये अमिताभ बच्चन यांच्या व्यक्तिमत्त्व अधिकारांच्या संरक्षणासाठी अंतरिम आदेश दिला होता. त्यांच्या परवानगीशिवाय नाव, आवाज, छायाचित्र किंवा व्यक्तिमत्त्वाचा व्यावसायिक वापर केल्यास त्यांच्या अधिकारांवर परिणाम होऊ शकतो, असे न्यायालयाने नमूद केले होते. आता १६ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सुनावणीत तडजोडीवर काय निर्णय होतो आणि अमिताभ बच्चन यांना प्रत्यक्ष उपस्थित राहावे लागते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com