Akshay Kumar Eye Surgery: बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारवर शस्त्रक्रिया; रुग्णालयात दाखल; नेमकं कारण काय?

Akshay Kumar Eye Surgery Health Update: अक्षय कुमारच्या हेल्थबाबत अपडेट समोर आली आहे. अक्षय कुमारच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. अभिनेत्याने थोडा वेळ कामातून ब्रेक घेतला आहे.
Akshay Kumar Eye Surgery
Akshay Kumar Eye SurgerySaam Tv
Published On
Summary

अक्षय कुमारच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया झाली

६ मे रोजी करण्यात आली होती शस्त्रक्रिया

अभिनेत्याने सध्या कामातून घेतलाय ब्रेक

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार नेहमीच चर्चेत असतो. अक्षय कुमार नेहमीट फिटनेस आणि कडक शिस्तीसाठी ओळखला जातो. आता अक्षय कुमारच्याबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. अक्षय कुमार सध्या रुग्णालयात अॅडमिट असल्याची माहिती समोर आली आहे. अक्षय कुमारच्या डोळ्याची सर्जरी करण्यात आली आहे. त्यामुळे त्याला रुग्णालयात ठेवण्यात आले आहे.

Akshay Kumar Eye Surgery
Akshay Kumar: 'त्या दिवशी माझा भुतांवर विश्वास...' अक्षय कुमारच्या घरात महिलेचा आत्मा, खिलाडीने सांगितला भयानक अनुभव

अक्षय कुमारचा भूत बंगला चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. या चित्रपटानंतर त्याने दुसऱ्या चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात केली. परंतु त्यामध्येच आता अभिनेत्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय कुमारच्या डोळ्याची शस्त्रक्रिया झाली आहे.

अक्षय कुमारवर झाली शस्त्रक्रिया

अक्षय कुमारची दृष्टी सुधारण्यासाठी ही शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे समजत आहे. दिलासादायक म्हणजे ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. आता अभिनेता बरा होत आहे. मिडिया रिपोर्टनुसार, गेल्या काही दिवसांपासून अक्षय कुमारला डोळ्यांचा त्रास होत होता. ज्यामुळे त्याला ही शस्त्रक्रिया करावी लागली. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, ही एक नियमित प्रक्रिया होती, असं सांगितलं आहे. शस्त्रक्रियेनंतर डोळ्यांना पूर्णपणे बरं होण्यासाठी वेळ मिळावा म्हणून विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आली आहे.

Akshay Kumar Eye Surgery
Akshay Kumar: अक्षय कुमारच्या लेकीकडे अश्लील फोटोंची मागणी, आरोपी गजाआड; खिलाडीने सांगितली A टू Z माहिती

६ मे रोजी झाली शस्त्रक्रिया (Akshay Kumar Eye Surgery)

अक्षय कुमार सध्या केरळमध्ये चित्रपटाचे शुटिंग करत आहे. या चित्रपटाच्या शुटिंगदरम्यानच ६ मे रोजी त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर आता सध्या अक्षय कुमार ब्रेकवर आहे. तो सध्या आराम करत आहे. यानंतर थोड्या दिवसांनी अक्षय कुमार पुन्हा एकदा शुटिंगसाठी जाणार आहे.

Akshay Kumar Eye Surgery
Akshay Kardile: राहुरीत पुन्हा कर्डिले पॅटर्न! शरद पवारांच्या उमेदवाराचा १ लाख मतांनी पराभव; वडिलांच्या आठवणीत अक्षय झाले भावुक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com