Akshay Kumar: 'त्या दिवशी माझा भुतांवर विश्वास...' अक्षय कुमारच्या घरात महिलेचा आत्मा, खिलाडीने सांगितला भयानक अनुभव

Akshay Kumar: अक्षय कुमारने नुकतीच त्याच्या घरी घडलेली एक अत्यंत भयानक घटना सांगितली आहे. भुतं अस्तित्वात असतात का, असे विचारले असता अक्षयने त्याला हो म्हणून एक धक्कादायक अनुभव सांगितला आहे.
akshay kumar
akshay kumarSaam Tv
Published On

Akshay Kumar: अक्षय कुमार सध्या त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याचा आगामी चित्रपट भूत बंगला (Bhoot Bangla) १० एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. हा एक 'हॉरर-कॉमेडी' (भयपट-विनोदी) चित्रपट असून, यात अक्षय एका विनोदी भूमिकेत दिसणार आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत, अक्षयने आपण भुतांवर विश्वास ठेवतो की नाही, याबद्दल खुलासा केला. आपला मुद्दा पटवून देण्यासाठी त्याने आपल्या जुन्या घरातील एक किस्सा सांगितला.

ट्विंकल खन्नाला घरात कोणीतरी असल्याचे जाणवले

इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत अक्षय कुमार म्हणाला, "आम्ही ज्या घरात राहत होतो, तिथे माझी पत्नी मला सतत म्हणायची, 'इथे काहीतरी विचित्र किंवा गडबड आहे.' त्यावेळी माझा मुलगा आरव साधारण चार-पाच वर्षांचा होता."

akshay kumar
Dhurandhar 2: पहिल्याच दिवशी २०० कोटी तर एका आठवड्यात ५०० कोटी; रणवीर सिंगचा 'धुरंधर २' करणार नवा रेकॉर्ड

घरात एका महिलेच्या चालण्याचा आवाज ऐकू येतो

अक्षयने पुढे सांगितले, "मी तिला म्हणायचो, 'टीना, तू एक सुशिक्षित स्त्री आहेस. तू अशा गोष्टी कशा काय बोलू शकतेस?' पण ती आपल्या म्हणण्यावर ठाम असायची आणि म्हणायची की, तिला घरात एका महिलेच्या चालण्याचा आवाज ऐकू आला आहे."

akshay kumar
Super Duperr Movie: एक फ्लॅट, दोन कुटुंब...; निर्मिती सांवत आणि च्या 'सुपर डुपर'चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

अक्षयने सांगितले की, तो टीनाच्या या शंकांकडे सतत दुर्लक्ष करत राहिला आणि तिच्या बोलण्याकडे कानाडोळा करत असे; पण एके दिवशी तो पूर्णपणे हादरला. त्या गोष्टीची आठवण करून देत अक्षय म्हणाला, "एके दिवशी माझा मुलगा झोपला होता. अचानक त्याने एका जागेकडे बोट दाखवले आणि म्हणाला, 'इथे राहू नकोस; निघून जा! तुला इथून जावं लागेल.' मी त्याला विचारले, 'तू कोणाशी बोलत आहेस?' काही क्षणांसाठी तर मी सुद्धा अवाक झालो होतो. तेव्हा माझी पत्नी म्हणाली, 'पाहिलंस? मी तुला आधीच सांगितले होते ना इथे कोणीतरी नक्कीच आहे. तुझा मुलगा सुद्धा कोणाशीतरी बोलत आहे. नक्कीच काहीतरी गडबड आहे.'

अक्षयने पुढे सांगितले की, त्या दिवशी, मी हे मान्य केले की भुतं अस्तित्वात असतात आणि खरोखरच कोणत्यातरी नकारात्मक ऊर्जा असते. अशी ऊर्जा, जी अगदी त्याच क्षणी त्याच्या घरात उपस्थित होती. या मुलाखातीत अक्षयने दिग्दर्शक प्रियदर्शनचे कौतुकही केले. या जोडीने यापूर्वी हेरा फेरी, भागम भाग, भूल भुलैया, गरम मसाला आणि खट्टा मीठा या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. अक्षय व्यतिरिक्त, चित्रपटात परेश रावल, राजपाल यादव, असरानी आणि वामिका गब्बी आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून अक्षय कुमार आणि प्रियदर्शन ही जोडी १६ वर्षांनंतर पुन्हा एकदा पडद्यावर एकत्र येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com