Aishwarya Narkar: अंगारो सा गाण्याला मराठी तडका; 'लाजरानं साजरां मुखडा' गाण्यावर पतीसह थिरकली ऐश्वर्या, Video पाहा

Aishwarya Narkar Dance Video Viral: अभिनेत्री ऐश्वर्या नारकरने नुकतंच सोशल मीडियावर एक रिल शेअर केली आहे. ज्यामध्ये 'अंगारो सा' या गाण्यानंतर मराठी गाणं रिमिक्सवर ऐश्वर्या आणि पती अविनाश डान्स करताना दिसत आहेत.
Entertainment News
Aishwarya NarkarSaamtv

सध्या सोशल मीडियावर 'पुष्पा 2' चित्रपटातील 'अंगारो सा' या गाण्याची तुफान क्रेझ आहे. अनेक सेलिब्रिटीसह नेटकरी या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. आता अंगारो सा गाण्याला मराठी गाण्यांची जोड देत रिल बनवण्याचा ट्रेंड सुरू आहे.

अभिनेत्री ऐश्वर्या नारकरने नुकतंच सोशल मीडियावर एक रिल शेअर केली आहे. ज्यामध्ये 'अंगारो सा' या गाण्यानंतर मराठी गाणं रिमिक्सवर ऐश्वर्या आणि पती अविनाशसोबत डान्स करताना दिसत आहेत. ऐश्वर्याने काळ्या रंगाच्या काठपदरी साडी परिधान केली आहे. तर अविनाशने काळा प्रिंटेड कुर्ता घातलाय. ऐश्वर्याने केसांत गजरा माळला आहे. मराठमोळ्या सौंदर्यात दोघांनीही नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. (Entertainment Marathi News)

रिलमध्ये सुरूवातीला ऐश्वर्या आणि अविनाश 'अंगारो सा' गाण्यावर डान्स करत आहेत. गाण्यातील हुक स्टेप्स करताना दोंघेही दिसत आहेत. यानंतर रिमिक्समध्ये या दोघांनीही 'लाजरा न साजरा मुखडा' या गाण्यावर ठेका धरला आहे. दोघेही अप्रतिम डान्स करत आहेत.

Entertainment News
Prajakta Koli: साउथ इंडियन स्वॅग अन् मराठी तडका; मराठमोळी युट्यूबर प्राजक्ता कोळीने केला 'अंगारो सें' गाण्यावर जबरदस्त डान्स

ऐश्वर्याने रिल शेअर करत #marathi #trend #couple #saree असे हॅशटॅग दिले आहेत. ऐश्वर्याच्या व्हायरल रिलवर नेटकऱ्यांकडून तुफान लाईक्स आणि प्रतिक्रिया येत आहेत. तर अनेकांनी या गाण्याला रिक्रिएट करून रिल्स बनवल्या आहेत.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com