Prajakta Koli: साउथ इंडियन स्वॅग अन् मराठी तडका; मराठमोळी युट्यूबर प्राजक्ता कोळीने केला 'अंगारो सें' गाण्यावर जबरदस्त डान्स

Prajakta Koli Dance Video: सोशल मीडियावर सध्या अंगारो सा या गाण्याची क्रेझ आहे. अनेकांनी या गाण्यावर रिल्स बनवल्या आहेत. आता युट्यूबर प्राजक्ता कोळीनेदेखील या गाण्यावर डान्स केला आहे.
Prajakta Koli Dance Video
Prajakta Koli Dance VideoSaam Tv

मराठमोळी युट्यूबर प्राजक्ता कोळी ही नेहमी चर्चेत असते. प्राजक्ता कोळी ही नेहमी सोशल मीडियावर वेगवेगळे व्हिडिओ पोस्ट करत असते. प्राजक्ताने नुकताच सोशल मीडियावर अंगारो सा गाण्यावर सुंदर रिल पोस्ट केली आहे. प्राजक्ता कोळीने अंगारो सा गाण्यासोबतच आली ठुमकत, मान मुरडत या मराठी गाण्याचं मॅशअप केलं आहे. प्राजक्ताना या रिमिक्स साँगवर रिल बनवली आहे.

प्राजक्ताने निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. तिने सुंदर रिल बनवली आहे. रिलमध्ये सुरुवातीला प्राजक्ता अंगारो सा गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. ती सेम टू सेम स्टेपदेखील करते. त्यानंतर मध्येच 'आली ठुमकत, मान मुरडत' हे गाणं वाजतं. त्यानंतर ती मराठी गाण्यावर ठेका धरते. प्राजक्ता खूप सुंदर डान्स करत आहे.

प्राजक्ताच्या या डान्स रिलवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव झाला आहे. प्राजक्ताच्या या रिलमध्ये दाक्षिणात्य गाणे आणि मराठी गाण्यावर सुंदर मॅशअप केले आहे. प्राजक्ताच्या या रिलवर जर मला स्लो डान्स करायला असेल तर मी स्लो मोशनमध्ये डान्स करेन, असं कॅप्शन दिले आहे.

Prajakta Koli Dance Video
Aditi Dravid Dance Video: मराठमोळ्या अभिनेत्रीचा आजीसोबत 'अंगारो सा' गाण्यावर डान्स, फायर स्टेप्सने वेधले लक्ष, व्हिडिओ पाहा

प्राजक्ताचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओचे श्रीवल्ली म्हणजेच रश्मिका मंदानानेदेखील कौतुक केले आहे. तिने हा व्हिडिओ स्टोरीवर शेअर करत प्राजक्ताचे कौतुक केले आहे.

अल्लू अर्जुन आणि रश्मिकाच्या अंगारो सा गाण्याची सोशल मीडियावर प्रचंड क्रेझ आहे. सोशल मीडियावर या गाण्यावर अनेकांनी रिल्स बनवल्या आहेत.

Prajakta Koli Dance Video
Alka Yagnik: व्हायरल अटॅकनंतर गायिका अलका याज्ञिकना ऐकूच येईना; नेमकं काय घडलं, वाचा सोशल पोस्ट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com