Aditi Dravid Dance Video: मराठमोळ्या अभिनेत्रीचा आजीसोबत 'अंगारो सा' गाण्यावर डान्स, फायर स्टेप्सने वेधले लक्ष, व्हिडिओ पाहा

Aditi Dravid Dance On Pushpa 2 Song: मराठी अभिनेत्री अदिती द्रविडने तिच्या आजीसोबत 'अंगारो सा' या गाण्यावर डान्स केला आहे. डान्सकरतानाचा व्हिडिओ तिने तिच्या इन्स्टाग्राम हॅडलवर शेअर केला आहे.
Aditi Dravid Dance Video: मराठमोळ्या अभिनेत्रीचा आजीसोबत 'अंगारो सा' गाण्यावर डान्स, फायर स्टेप्सने वेधले लक्ष, व्हिडिओ पाहा

पुष्पा या चित्रपटाच्या सुपरहिट यशानंतर पुष्पा 2 या चित्रपटाच्या प्रतिक्षेत चाहते आहेत. अभिनेता अल्लु अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना अभिनीत या चित्रपटाकडे सर्वांचेच लक्ष आहे.

काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचा टीझर रिलीज झाला. यानंतर चित्रपटातील गाणीही प्रेक्षकांच्या भेटीला आली. चित्रपटातील 'अंगारो सा' या गाण्याने सोशल मीडियावर अक्षरक्ष: धुमाकूळ केलाय. सोशल मीडियावर या गाण्याची तुफान क्रेझ आहे. सेलिब्रिटीसह अनेक नेटकरी या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. (Entertainment Marathi News)

Aditi Dravid Dance Video: मराठमोळ्या अभिनेत्रीचा आजीसोबत 'अंगारो सा' गाण्यावर डान्स, फायर स्टेप्सने वेधले लक्ष, व्हिडिओ पाहा
Rinku Rajguru: एकुलत्या एक लेकीसाठी कसा मुलगा हवाय? रिंकू राजगुरूच्या वडिलांनी सांगितली मनातली गोष्ट

मराठी सेलिब्रिटींना या गाण्याची भुरळ पडली आहे. नुकतंच मराठी अभिनेत्री अदिती द्रविडने तिच्या आजीसोबत 'अंगारो सा' या गाण्यावर डान्स केला आहे. डान्सकरतानाचा व्हिडिओ तिने तिच्या इन्स्टाग्राम हॅडलवर शेअर केला आहे.

अदिती आणि तिच्या आजीच्या परफेक्ट स्टेप्स आणि एक्सप्रेशन पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. सोशल मीडियावर या व्हिडिओला चाहत्यासह अनेक सेलिब्रिटींनी लाईक आणि कमेंट केल्या आहेत. अनेकांनी आजीच्या डान्सचे कौतुक देखील केले आहे.

अदिती द्रविड ही मराठी सिनेविश्वातली प्रसिद्ध अभिनेत्री आहे. नाटक आणि मराठी मालिकांमध्ये अदितीने काम केले आहे. माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेमुळे अदितीला विशेष ओळख मिळाली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com