Rinku Rajguru: एकुलत्या एक लेकीसाठी कसा मुलगा हवाय? रिंकू राजगुरूच्या वडिलांनी सांगितली मनातली गोष्ट

Rinku Rajguru: नुकताच फादर्स डे सर्वत्र साजरा झाला आणि यावेळी रिंकूच्या वडीलांनी मुलाखतीत आपल्या मुलीविषयी स्पष्ट मत व्यक्त केले आहे.
Rinku Rajguru
Rinku RajguruSaam Tv

'सैराट' फेम रिंकू राजगुरू कायमच चर्चेत असते. 'सैराट' या चित्रपटातून घराघरात ओळखली जाणारी रिंकू लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. रिंकूने तिच्या अभिनयाने सर्वांचीच मने जिंकली. (Enetertainment Marathi News)

नुकतंच फादर्स डे निमित्त रिंकू आणि तिच्या वडिलांनी एका युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी रिंकूच्या वडीलांनी रिंकूचा होणारा नवरा आणि त्यांना जावई कसा हवाय? याविषयी सांगितले आहे. त्यांनी रिंकू जो मुलगा तिचा जोडीदार म्हणून पसंत करेल, तो आम्हाला मान्य असेल. पण तिने सांगितल्यावर आम्ही त्यावर निर्णय घेऊ, असं त्यांनी सांगितले.

पुढे त्यांनी, रिंकूला आम्ही ज्याप्रमाणे स्वातंत्र्य दिले आहे. त्याचप्रमाणे मुलाने देखील तिला स्वातंत्र्य द्यावे. इकडे जाऊ नकोस, तिकडे जाऊ नकोस या बंधनात तिला ठेवु नये. असे सांगितले. तसेच रिंकू ज्या क्षेत्रात काम करते आहे. त्यामुळे तिला प्रत्येक ठिकाणी भेट द्यावी लागते. या गोष्टी ज्या मुलाला मान्य असतील तो मुलगा आम्हाला मान्य असेल. असे रिंकूच्या वडिलांनी सांगितले.

Rinku Rajguru
Ranbir- Raha News : 'उंगली पकड के तूने चलना सिखाया था ना...', रणबीर- राहाच्या क्यूट फोटोने वेधलं लक्ष

अभिनेत्री रिंकूचे वडिल महादेव राजगुरू हे पेशाने शिक्षक आहेत. नुकताच फादर्स डे सर्वत्र साजरा झाला आणि यावेळी रिंकूच्या वडीलांनी मुलाखतीत आपल्या मुलीविषयी स्पष्ट मत व्यक्त केले आहे.

रिंकू राजगुरू ही मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. २०१६ मध्ये रिंकूने दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या 'सैराट' या चित्रपटातून मनोरंजनसृष्टीत पाऊल टाकले आहे. यानंतर ती 'कागर', 'झुंड' आणि 'झिम्मा-२' या चित्रपटात दिसली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com