Sonali Kulkarni Dance Video: मराठमोळ्या श्रीवल्लीचं 'अंगारो सा' गाण्यावर डान्स, लुंगी स्टाईलने वेधलं लक्ष
मराठी सिनेसृष्टीतील 'अप्सरा' सोनाली कुलकर्णीच्या (Sonalee Kulkarni) अदाकारीने सर्वांनाच वेड केलं आहे. मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत सोनालीने तिचं वर्चस्व निर्माण केलं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून सोनाली कायम चाहत्यांच्या संपर्कात असते. सोनालीचे व्हिडीओ व फोटो तुफान व्हायरल होतात. (Entertainment Marathi News)
सध्या सोशल मीडियावर सोनालीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. सोनालीने अभिनेता अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना अभिनीत 'पुष्पा 2' या साऊथ चित्रपटातील गाण्यावर डान्स केला आहे. सोशल मीडियावर सोनालीने हा व्हिडीओ पोस्ट करत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
अभिनेता अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानाच्या पुष्पा या सुपरहिट चित्रपटाचा सिक्वेल येत आहेत. चाहतेही या सिनेमाच्या प्रतिक्षेत आहेत. नुकतंच या सिनेमातील दुसरे गाणं रिलीज झाले आहे. गाण्याचं नाव अंगारों सा आहे. गाणे रिलीज होताच या गाण्याची क्रेझ नेटकऱ्यांमध्ये दिसत आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीलाही या गाण्याची भुरळ पडली आहे. सोनालीने हटके अंदाजात या गाण्यावर डान्स केला आहे.
सोनालीने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये ती पुष्पा आणि श्रीवल्लीच्या गाण्यावर नाचताना दिसत आहे. सोनालीच्या हटके स्टाईलने लक्ष वेधून घेतले. निळ्या रंगाच्या लाँग गाऊनमध्ये सोनालीने ड्रेसची लुंगी स्टाईल करून सर्वांनाच थक्क केले आहे. सोनालीचा हा व्हिडीओ सध्या सर्वत्र चर्चेत आहे. सोनालीच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाईक्ससह कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 'आमचा सामे' असं सोनालीच्या फोटोंवर प्रतिक्रिया आल्या आहेत.

