Marathi Actress Wedding : मराठमोळी अभिनेत्री अडकली लग्नबंधनात; नवऱ्याचे चित्रपटसृष्टीशी आहे खास कनेक्शन, पाहा विवाह सोहळ्याचे PHOTOS

Apurva Gore Wedding : 'आई कुठे काय करते' फेम मराठी अभिनेत्री अखेर लग्न बंधनात अडकली आहे. लग्न सोहळ्याचे खास फोटो तिने शेअर केले आहेत. तिच्या नवऱ्याबद्दल जाणून घेऊयात.
Apurva Gore Wedding
Marathi Actress Weddingsaam tv
Published On
Summary

'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री नुकतीच लग्न बंधनात अडकली आहे.

अभिनेत्रीने लग्न सोहळ्याचे सुंदर फोटो शेअर केले आहेत.

फेब्रुवारी महिन्यात अभिनेत्रीने आपल्या प्रेमाची कबुली दिली.

'आई कुठे काय करते' या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री अपूर्वा गोरे लग्न बंधनात अडकली आहे. तिने लग्न सोहळ्याचे खूप सुंदर फोटो शेअर केले आहेत. अपूर्वा गोरेने 'शाळा' फेम प्रसिद्ध अभिनेता अंशुमन जोशीसोबत आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात केली आहे. 2012 ला रिलीज झालेला 'शाळा' चित्रपटामुळे अंशुमन जोशीला खूप लोकप्रियता मिळाली. तर अपूर्वा गोरेने 'आई कुठे काय करते' मालिकेत ईशाची भूमिका साकारली होती. ज्यामुळे तिला खूप प्रसिद्धी मिळाली.

अपूर्वा-अंशुमनच्या पोस्ट

अपूर्वा आणि अंशुमनने लग्नाचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. ज्यात दोघे खूपच आनंदी पाहायला मिळत आहे. या फोटोंना त्यांनी खास कॅप्शन देखील दिलं आहे. त्यांनी लिहिलं की, "श्री व सौ" त्यांच्या या पोस्टवर चाहते, कलाकार मंडळी कमेंट्सचा, प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहे. त्यांना नवीन आयुष्यासाठी शुभेच्छा देताना दिसत आहेत. दोघांनी लग्नासाठी पारंपरिक लूक केला होता.

अपूर्वा-अंशुमनचा लूक

अपूर्वाने हिरव्या रंगाची, जांभळा काठ असलेली नऊवारी साडी नेसली आहे. मराठमोळा साज श्रृंगार करून अंशुमनची नवरी नटली. हातात हिरव्या बांगड्या, गळ्यात सुंदर दागिने, नाकात नथ, कपाळावर टिकली आणि मुंडावळ्या यांमध्ये अपूर्वा खूपच सुंदर दिसत आहे. तर अंशुमनने पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि पिवळ्या रंगाचे धोतर परिधान केले आहे.

अपूर्वा-अंशुमनच्या लग्नाचे फोटो

पहिल्या फोटोमध्ये दोघे एकमेकांचा हात हातात धरून लग्नाचा आनंद व्यक्त करताना दिसत आहे. दुसऱ्या फोटोमध्ये अंशुमन अपूर्वाच्या गळ्यात मंगळसूत्र घालताना दिसत आहे. तर तिसऱ्या फोटोमध्ये अंशुमन अपूर्वाच्या भांगेत कुंकू भरत असल्याचे दिसत आहे.

Apurva Gore Wedding
Anurag Dobhal : १५० च्या स्पीडमध्ये कार, डोळ्यात अश्रू; युट्यूबर अनुराग डोभालचा आत्महत्येचा प्रयत्न, VIDEO व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com