Washim Crime: पोटच्या मुलीला नराधम बापानं केला संपवण्याचा प्रयत्न, हल्लामागील कारण काय?

Washim Crime: बाहेरगावी जाणाऱ्या एका मुलीवर बापाने चाकू हल्ला केल्याची घटना वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यात घडलीय. बापाने पोटच्या मुलीला जिवे मारण्याचा प्रयत्न का केला याची माहिती अद्याप कळू शकलेले नाहीये. दरम्यान पोलिसांनी नराधम बापाला ताब्यात घेतलं आहे.
Washim Crime
Washim Crime Yandex
Published On

(मनोज जयस्वाल )

Washim Crime Father Tried To Kill Daughter :

वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील कामरगाव येथील लाडेगाव एक धक्कादायक घटना घडलीय. मुलगी आणि वडिलांचं नातं हे अत्यंत घट्ट आणि जिव्हाळ्याचं नातं असतं. एखादा बाप आपल्या मुलीच्या डोळ्यात कधीच अश्रू बघू शकत नाही. पण लाडेगाव येथील एका बापाने पोटच्या लेकीला संपवण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडलीय.

मुलीवर चाकू हल्ला करून तिला गंभीर जखमी केलं आहे. ही घटना लाडेगाव ऑटो पॉईंट चौकात घडलीय. बापाने मुलीला संपवण्याचा प्रयत्न का केला, त्या मागे काय कारण आहे, याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाहीये.

मानोरा तालुक्यात असलेल्या हिवरा येथील १६ वर्षीय मुलगी लाडेगाव ऑटो पॉईंट चौकात उभी होती. ही मुलगी पिप्री मोडक येथे जाणार होती. त्यावेळी या मुलीचे वडील तेथे आले आणि त्यांनी मुलीवर चाकू हल्ला चढवला. या हल्ल्यात मुलीच्या गळ्यावर आणि पाठीवर वार झाल्याने ती गंभीर जखमी झालीय. जखमी अवस्थेत तिला उपचारासाठी कामरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरून चाकू हल्ला करणाऱ्या बापाला ताब्यात घेतले आहे.दरम्यान घटनेचा अधिक तपास धनज पोलीस करीत आहेत.

Washim Crime
Beed Crime News: आजीच्या डोक्यात दगड घालून नातवाने केला खून; धक्कादायक घटनेनं बीड हादरलं

लातूरमध्ये अशीच एक घटना घडली होती. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात असलेल्या आशिव गावातील एका दारुड्या बापाने पोटच्या दीड वर्षीय मुलीची हत्या केली होती. आशिव गावातील २९ वर्षीय आरोपी व्यक्ती व्यसनच्या आहारी गेलेला होता. व्यसनाची हौस भागवण्यासाठी सतत पत्नीशी भांडण करत असे. यासोबतच पत्नीच्या चारित्र्यवर संशय घेत होता. यामुळे घरात सतत भांडण होत. दोघाच्या भांडणात आरोपीने दीड वर्षांच्या मुलीला घरातील पाण्याने भरलेल्या हौदात टाकून दिले.

चंद्रपूर जिल्ह्यात एका आईने चारित्र्याच्या संशयावरून गर्भवती मुली हत्या केल्याची घटना घडली होती. राजुरा तालुक्यातील कविटपेठ येथे विहिरीत या गर्भवती महिलेचा मृतदेह आढळला होता. पतीपासून विभक्त राहणारी सैदा गर्भवती राहिल्याने तिच्या चारित्र्याबाबत आईला शंका आली होती. त्यानंतर तिने मुलीची हत्या केली .

Washim Crime
मायलेकीच्या नात्याला काळीमा! चारित्र्याच्या संशयांवरुन जन्मदात्या आईने सुपारी देऊन केली गर्भवती मुलीची हत्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com