Wardha Crime: लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण; अल्पवयीन मुलगी गर्भवती, आरोपीला १० वर्षांची शिक्षा

Wardha News: आरोपीने गुन्हा केल्याचा सबळ पुरावा उपलब्ध झाल्यामुळे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारतर्फे विशेष सरकारी अभियोक्ता अड. विनय आर घुडे यांनी कामकाज पाहत यशस्वी युक्तीवाद केला.
 Wardha Crime News
Wardha Crime News Saam TV
Published On

चेतन व्यास, वर्धा|ता. ९ जानेवारी २०२४

Wardha Crime News:

अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष देत तिचे वारंवार लैंगिक शोषण करीत गर्भवती करणाऱ्या आरोपी कमलेश अशोक यावले (२३ रा. कन्नमवारग्राम) याला १० वर्षाच्या सश्रम कारावासाची तसेच पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठाविण्यात आली आहे. वर्ध्याचे अतिरिक्त विशेष जिल्हा न्यायाधीश व्हि.टी. सुर्यवंशी यांनी हा निर्वाळा दिला.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

आरोपी कमलेशने पीडितेला सन २०१८ मध्ये लग्नासाठी विचारले होते. तेव्हापासून दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. कमलेशने पीडितेला १६ सप्टेंबर २०१९ रोजी खैरी डॅम येथे फिरायला नेले होते. तेथे त्याने पीडितेला लग्नाचे आमिष देत इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर तो वारंवार पीडितेला भेटण्यासाठी त्याच्या शेतात बोलावत लैंगिक शोषण करत होता.

याची पीडितेच्या वडिलांना माहिती झाल्याने त्यांनी पीडितेची समजूत घालून तिला मामाच्या गावी पाठवले. पीडितेला मासिक पाळी न आल्याने तिने टेस्ट केली असता ती गर्भवती असल्याचे तिला समजले. याबाबत तिने कमलेशला माहिती दिली असता त्याने १० मे २००५ रोजी पुन्हा भेटण्यासाठी शेतात बोलावून न आल्यास आई वडिलांना जिवे मारण्याची धमकी दिली.

 Wardha Crime News
Beed News : पैसे मिळवून द्या अन्यथा सामूहिक आत्मदहनाची परवानगी द्या; मल्टिस्टेट बँकेविरोधात ठेवीदार संतप्त

पीडिता मामाच्या गावाहून आरोपीला भेटण्यासाठी गेली असता तेथे पुन्हा जबरदस्तीने पीडितेसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. पीडिता गर्भवती असल्याचे समजताच आरोपीने जबरदस्तीने गर्भपात होण्याच्या गोळया खाऊ घातल्या त्यामुळे पीडितेचा १८ मे २००५ रोजी घरीच अबॉर्शन झाले.

काही दिवसांनी पीडितेने लग्नास गळ घातली असता आरोपीने लग्न करण्यास नकार दिला. पीडितेने ही बाब तिच्या घरी सांगून कारंज पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करीत उपनिरीक्षक जोस्ना प्रभु गिरी यांनी तपास केला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

 Wardha Crime News
Nanded News : निकृष्ट भोजन पुरवठ्याची तक्रार; ठेकेदाराकडून विद्यार्थ्यांना धमकी, पुरवठ्याचे कंत्राट रद्द

आरोपीने गुन्हा केल्याचा सबळ पुरावा उपलब्ध झाल्यामुळे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारतर्फे विशेष सरकारी अभियोक्ता अड. विनय आर घुडे यांनी कामकाज पाहत यशस्वी युक्तीवाद केला. न्यायाधीशांसमोर शासनातर्फे एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले.

इतकेच नव्हेतर आरोपीने त्याच्या बचावासाठी एक साक्षीदाराची साक्ष नोंदविली होती. मात्र, त्याचा काही फायदा झाला नसून पीडिता, पीडितेचे वडिल, वैद्यकीय अधिकारी व इतर असे सहा साक्षदारांची साक्ष व सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरुन न्यायाधीशांनी आरोपीस शिक्षा ठोठावली. (Latest Marathi News)

 Wardha Crime News
Uri Attack : उरी हल्ल्याच्या घटनेत सर्वात मोठा खुलासा, अमेरिकेने पाकिस्तानला दिले होते भक्कम पुरावे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com