Nanded News : निकृष्ट भोजन पुरवठ्याची तक्रार; ठेकेदाराकडून विद्यार्थ्यांना धमकी, पुरवठ्याचे कंत्राट रद्द

Nanded News : कंत्राट देण्यात आले आहे. मात्र शाळेतील विद्यार्थ्यानी निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत असल्याची तक्रार प्रशासनाकडे केली होती. याच कारणावरून कंत्राटदाराने वाद घातला असल्याचा आरोप केला आहे.
Nanded News
Nanded NewsSaam tv
Published On

संजय सूर्यवंशी

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील नायगाव येथील एका निवासी शाळेत भोजन पुरवठा व्यवस्थित होत नसल्याची तक्रार (Nanded) विद्यार्थ्यानी केली होती. यामुळे चिडलेल्या ठेकेदाराने धमकावल्याचा आरोप (Student) विद्यार्थ्यांनी केला. तक्रारीची दखल घेत प्रशासनाने कंत्राट रद्द केले. (Latest Marathi News)

Nanded News
Shirpur Crime : दारूसाठी पैसे दिले नाही म्हणून पत्नीचा कान कापून घेतला दागिना

नांदेड जिल्ह्यातील नायगाव येथे सामाजिक न्याय विभागाची मागासवर्गीय मुलांची निवासी शाळा (School) आहे. येथे राहणाऱ्या विद्यार्थ्यांना भोजन दिले जात असते. यासाठी कंत्राट देण्यात आले आहे. मात्र शाळेतील विद्यार्थ्यानी निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत असल्याची तक्रार प्रशासनाकडे केली होती. याच कारणावरून कंत्राटदाराने वाद घातला असल्याचा आरोप केला आहे. हा वाद समाजकल्याण विभागाकडे गेला होता. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Nanded News
Beed News : पैसे मिळवून द्या अन्यथा सामूहिक आत्मदहनाची परवानगी द्या; मल्टिस्टेट बँकेविरोधात ठेवीदार संतप्त

नवीन ठेकेदाराची नेमणूक 

सदर प्रकरणाच्या तक्रारीनंतर समाजकल्याण अधिकारी यांनी वसतिगृहाला भेट देऊन माहिती घेतली. या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेऊन भोजन पुरवठा करण्याचा ठेका रद्द करत ठेकेदाराची हकालपट्टी केली आहे. यानंतर नवीन ठेकेदाराची नेमणूक करण्यात आल्याची माहिती समाजकल्याण अधिकारी राजेश मिरगीरे यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com