Beed News : पैसे मिळवून द्या अन्यथा सामूहिक आत्मदहनाची परवानगी द्या; मल्टिस्टेट बँकेविरोधात ठेवीदार संतप्त

Beed News : बीड मधील ज्ञानराधा मल्टीस्टेट, मासाहेब जिजाऊ मल्टीस्टेट, परिवर्तन बँक, साईराम बँक यासह अनेक पतसंस्था आणि मल्टीस्टेट बँक ठेविदारांचे पैसे घेऊन बंद पडल्या आहेत
Beed News
Beed NewsSaam tv
Published On

बीड : बीडमध्ये ठेवीदारांचे पैसे घेऊन गायब झालेल्या मल्टीस्टेट बँके विरोधात ठेवीदारांसह स्वाभिमानी संघटना (Beed) आक्रमक झाली आहे. स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन उबाळे यांच्या नेतृत्वाखाली बीडमध्ये ठेवीदारांनी आंदोलनाचा पवित्रा घेत बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले आहे. (Breaking Marathi News)

Beed News
Shirpur Crime : दारूसाठी पैसे दिले नाही म्हणून पत्नीचा कान कापून घेतला दागिना

बीड मधील ज्ञानराधा मल्टीस्टेट, मासाहेब जिजाऊ मल्टीस्टेट, परिवर्तन बँक, साईराम बँक यासह अनेक पतसंस्था आणि मल्टीस्टेट बँक (Bank) ठेविदारांचे पैसे घेऊन बंद पडल्या आहेत. बँकेचे अध्यक्ष, संचालक यानंतर फरार झाले आहेत. यामुळे पैसे मिळविण्यासाठी आता ठेविदार आक्रमक झाले आहेत. दरम्यान आम्ही जगावं कसं? असा प्रश्न उपस्थित करत लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासन आणि पोलीस (Police) प्रशासना विरोधात आक्रमक भावना यावेळी ठेविदारांनी व्यक्त केल्या आहेत. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Beed News
Nashik Crime: नाशिकला दर्शनासाठी आलेल्या कर्नाटकच्या महिलेची सोन्याची पोत लांबविली; आरोपी ४६ ग्रॅम सोन्यासह ताब्यात

अनेकदा ठेवीदारांनी आपल्या ठेवी परत देण्यासाठी मागणी करत आंदोलन केले आहे. परंतु अद्याप ठेवी मिळालेल्या नाहीत. मात्र आता जर आमचे पैसे मिळवून देता येत नसेल, तर पोलीस प्रशासनाने आम्हाला सामूहिक आत्मदहनाची परवानगी द्यावी; अशी संतप्त भावना आणि मागणी यावेळी ठेवीदारांनी केली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com