Nashik Crime: नाशिकला दर्शनासाठी आलेल्या कर्नाटकच्या महिलेची सोन्याची पोत लांबविली; आरोपी ४६ ग्रॅम सोन्यासह ताब्यात

Nashik News : भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेले एकूण तीन लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून या चेन चोरट्यांकडून तब्बल ४६ ग्रॅम सोनं पोलिसांनी हस्तगत केले आहे.
Nashik Crime
Nashik CrimeSaam tv
Published On

तबरेज शेख 

नाशिक : नाशिक शहरामध्ये दिवसाढवळ्या सोनसाखळी चोरीच्या घटना सुरूच आहेत. यात कर्नाटकाहून देवदर्शनासाठी (Nashik) आलेल्या महिला भाविकांच्या गळ्यातील सोन्याची माळ लांबविल्याची घटना घडली होती. मात्र पोलिसांनी (Police) तपासाची चक्र तात्काळ फिरवत आरोपीला ताब्यात घेतले आहे. (Tajya Batmya)

Nashik Crime
Cotton Price : कापसाचे दर वाढेना; आता भाव वाढीनंतरच विक्रीचा शेतकऱ्यांचा निश्चय, घरात साठवणूक

कर्नाटक राज्यातून काही भाविक खास नाशिक दर्शन करण्यासाठी आले होते. यावेळी द्वारका परिसरात हे भाविक बसमधून साहित्य घेण्यासाठी खाली उतरले असता अमृतांच्यावेळी कामगारनगर परिसरातील दोघांनी एका दुचाकीवर येत महिलेच्या गळ्यातील पोत तोडून फरार झाले होते. या घटनेचा पोलिसांनी तपास (Nashik Police) लावला असून दोन चेन चोरणाऱ्या संशयतांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून हे दोघेही नाशिकच्या विडी कामगारनगरमध्ये राहणारे आहेत.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Nashik Crime
Dhule Police : १५ मोबाईलसह चोरटा ताब्यात; धुळे पोलिसांची कारवाई

३ लाख १८ हजाराचा मुद्देमाल हस्तगत 

ओमकार उर्फ दीपक वसंत शिंदे आणि रोशन कटारे अशी दोघांची नावे असून या दोघांनाही पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून एका दुचाकीस ताब्यात घेतले आहे. भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेले एकूण तीन लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून या चेन चोरट्यांकडून तब्बल ४६ ग्रॅम सोनं पोलिसांनी हस्तगत केले आहे. पुढील तपास भद्रकाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सत्यवान पवार व त्यांचा पथक करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com