तबरेज शेख
नाशिक : धारदार तलवार सोबत घेऊन इंस्टाग्रामवर व्हिडिओ टाकून दहशत पसरवणाऱ्या तरुणाला (Nashik) चांगलेच महागात पडले आहे. या तरुणाला अटक नाशिक शहर पोलिसांच्या (Police) गुंडा विरोधी पथकाने केली आहे.
गुंडा विरोधी पथकातील अंमलदार यांना मिळालेल्या माहितीनुसार इंस्टाग्रामवर दिपक यादव नावाच्या व्यक्तीने दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने तलवार हातात घेऊन फोटो पोस्ट केला. पोलिसांनी (Nashik Police) या अंकाऊंटवरील माहिती मिळवून अंबड सातपुर लिंकरोडवरील संजीवनगर परिसरातील पेट्रोल पंपासमोर असलेल्या सनराईज रोलींग शटर या दुकानात मजुर म्हणून काम करणाऱ्या तरुणाला ताब्यात घेतले. मूळचा उत्तर प्रदेशमधील असलेल्या या युवकाला अटक करून त्याच्याकडून एक लोखंडी धारदार तलवार आणि एक लोखंडी गुप्ती ताब्यात घेण्यात आली.
संशयित विरोधात बेकायदेशीर हत्यार बाळगणे आणि मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी व्हिडीओ बनवतांनाच आणि अटक केल्या नंतरच व्हिडीओ बनवला आहे. जेणे करून व्हिडीओ बांवणून सोशल मीडियावर कोणी अशी धाडसी करणार नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.