Uri Attack : उरी हल्ल्याच्या घटनेत सर्वात मोठा खुलासा, अमेरिकेने पाकिस्तानला दिले होते भक्कम पुरावे

US-Pakistan News : उरी हल्ल्यात 'आयएसआय' या गुप्तचर संघटनेचा 'रोल' असल्याचे भक्कम पुरावे अमेरिकेने पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्याकडे दिले होते, असा उल्लेख माजी उच्चायुक्तांनी केलाय.
US-Pakistan On Uri Attack/representative Image
US-Pakistan On Uri Attack/representative ImageSAAM TV

Ajay Bisaria on Uri Attack :

जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ भारतीय लष्कराच्या तळावर सप्टेंबर २०१६ मध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात १९ जवान शहीद झाले होते. या हल्ल्याच्या घटनेत मोठा खुलासा करण्यात आला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पाकिस्तानमधील (Pakistan-India) भारताचे तत्कालीन उच्चायुक्त अजय बिसारिया यांनी 'एंगर मॅनेजमेंट : द ट्रब्ड डिप्लोमॅटिक रिलेशनशिप बिटवीन इंडिया अँड पाकिस्तान' या पुस्तकात या हल्ल्यासंदर्भात महत्वपूर्ण उल्लेख केला आहे.

उरी हल्ल्यात 'आयएसआय' या गुप्तचर संघटनेच्या भूमिकेचे भक्कम पुरावे अमेरिकेने पाकिस्तानचे (Pakistan) माजी पंतप्रधान नवाझ शरीफ (Nawaz Sharif) यांच्याकडे दिले होते, असा उल्लेख त्यात करण्यात आला आहे.

हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार, पाकिस्तानमध्ये अमेरिकी (US-Pakistan) राजदूतांनी सप्टेंबर २०१६ मध्ये या घटनेनंतर नवाझ शरीफ यांची भेट घेतली होती. उरी हल्ल्यात १९ जवान शहीद झाले होते. या हल्ल्यासाठी पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना (Terrorist) जैश ए मोहम्मदला जबाबदार धरले होते. यासंबंधित काही महत्वाचे पुरावे अमेरिकेने पाकिस्तानकडे सोपवले होते.

US-Pakistan On Uri Attack/representative Image
Modi Govt. Lakshadweep Plan: लक्षद्वीपमध्ये बनणार नवीन विमानतळ, लढाऊ विमानेही असणार तैनात, जाणून घ्या काय आहे मोदी सरकारचा प्लान?

अमेरिकेकडे होते भक्कम पुरावे

तत्कालीन उच्चायुक्त अजय बिसारिया २०१७ पासून २०२० पर्यंत पाकिस्तानमध्ये कार्यरत होते. उरी हल्ल्याच्या (Uri Attack) कटात आयएसआय सामील असल्याचा उल्लेख त्यांनी आपल्या पुस्तकात केला आहे. अमेरिकेने दिलेले पुरावे ठोस होते. त्यामुळे पाकिस्तानी सैन्याच्या विरोधात चौकशी करण्यात येईल, असं शरीफ यांना बोलावं लागलं. मात्र, त्याचा फटका शरीफ यांना बसला.

२०१७ मध्ये पीएमएल-एन पक्षाच्या प्रमुख पदावरून त्यांना हटवलं गेलं. त्याच्या पुढच्या वर्षीच म्हणजे २०१८ मध्ये शरीफ यांना देश सोडून जावं लागलं. शरीफ यांची भेट घेणाऱ्या त्या अमेरिकी राजदूताचं नाव बिसारिया यांनी उघड केलं नाही.

US-Pakistan On Uri Attack/representative Image
Japan Earthqueake News : नववर्षात जपानला भूकंपाचा दुसरा मोठा धक्का

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com