बॉयफ्रेंडसोबत बोलताना रडायचा मुलगा; निर्दयी मायनं ३ वर्षाच्या लेकाचा दाबला गळा

Women Killed Her Child : मथुरा जिल्ह्यातील छोली गावातील एका महिलेनं आपल्या पोटच्या पोराला जीवे मारलं. महिलेच्या नवऱ्यानं पोलिसात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी पत्नी आणि तिच्या प्रियकराविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Women Killed Her Child :
Police are investigating the death of a three-year-old child in Mathurasaam tv
Published On
Summary
  • मथुरामध्ये तीन वर्षांच्या मुलाच्या मृत्यू प्रकरणाला नवे वळण

  • आई आणि तिच्या कथित प्रियकराविरोधात हत्येचा गुन्हा

  • मुलाच्या वडिलांनी पत्नी आणि तिच्या प्रियकरावर केला आरोप

उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेनं आपल्या तीन वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केल्याची घटना बलदेव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील छोली गावात घडलीय. साधरण महिन्याभरापूर्वी घडलेल्या एका तीन वर्षांच्या मुलाच्या मृत्यूच्या प्रकरणात आता एक नवीन वळण आले आहे.

Women Killed Her Child :
Shocking : धक्कादायक! ३३ वर्षीय शिक्षिकेचं २० वर्षीय विद्यार्थ्यावर जडलं प्रेम, पतीला समजताच भयंकर घडलं

हाती आलेल्या माहितीनुसार, मुलाच्या वडिलांनी पत्नी आणि तिच्या प्रियकरावर हत्येचा आरोप केलाय. त्यांनी पोलिसात त्यांच्याविरोधात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी पत्नी आणि तिच्या प्रियकराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार तपास सुरू केला आहे. निष्पक्ष तपास सुरू असल्याचे आणि पुराव्यांच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल असे पोलिसांनी सांगितले आहे. कृष्ण मुरारी असं तक्रार व्यक्तीचं नाव आहे. तर आरोपी आईचं नाव रुची गुप्ता असं आहे.

Women Killed Her Child :
Crime News: एमआयएमच्या नगरसेवकावर प्राणघातक हल्ला; चंद्रपूर हादरलं!

लहान मुलावर अंत्यसंस्कार करण्यात आले

तक्रारदार कृष्ण मुरारी यांच्या म्हणण्यानुसार २८ जूनच्या संध्याकाळी त्यांची पत्नी रुची यांनी त्यांना फोन करून कळवले की, त्यांचा तीन वर्षांचा मुलगा माधव वारंवार प्रयत्न करूनही जागा होत नाहीये. त्यानंतर मुलाला उपचारांसाठी मथुरा येथील एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आलं. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यानंतर कुटुंबीयांनी मुलावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

पत्नी फोनवर प्रियकराशी फोनवर बोलायची

कृष्ण मुरारी यांनी आरोप केलाय की, काही वेळाने त्यांनी आपल्या पत्नीला एका तरुणाशी फोनवर बोलताना ऐकले. त्यावेळी तिने मुलाच्या मृत्यूबाबत चर्चा करत होती. त्यावेळी तिने आपल्या प्रियकराला सांगितलं की, तुझ्याशी फोनवर बोलत असताना मुलगा सतत रडायचा. त्यामुळे मला संताप आला, त्यामुळे मुलाचा गळा आवळून खून केल्याचं सांगितलं. कृष्ण मुरारी म्हणाले की पत्नीने मुलाचा खून केल्याची माहिती तिच्या प्रियकराला होती.

फोनवर बोलत असताना मुलगा रडायचा

तीन वर्षाचा मुलगा रडत होता, त्यावेळी रुची गुप्ता ही फोनवर बोलत होती. त्याला शांत करण्यासाठी त्याला रागावत होती. त्याचवेळी तिच्याकडून चुकीने मुलाचा गळा आवळला गेला. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर, तिने आपल्या पतीला केवळ एवढेच सांगितले की मूल उठत नाहीये, ही बाब पोलीस तपास उघड झाल्याची माहिती महावनचे सर्कल ऑफिसर संजीव कुमार राय यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com