Shocking : धक्कादायक! ३३ वर्षीय शिक्षिकेचं २० वर्षीय विद्यार्थ्यावर जडलं प्रेम, पतीला समजताच भयंकर घडलं

Chandigarh Crime News : चंदीगडमध्ये विवाहित शिक्षिकेचे विद्यार्थ्यासोबत कथित प्रेमसंबंध असल्याचा आरोप समोर आल्यानंतर पतीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.
CHANDIGARH TEACHER BOOKED AFTER HUSBAND'S SUICIDE AMID ALLEGED AFFAIR WITH STUDENT
CHANDIGARH TEACHER BOOKED AFTER HUSBAND'S SUICIDE AMID ALLEGED AFFAIR WITH STUDENTSaam Tv
Published On
Summary
  • चंदीगडमध्ये विवाहित शिक्षिकेचे विद्यार्थ्यासोबत कथित प्रेमसंबंध असल्याचा आरोप

  • पत्नीच्या कथित संबंधांमुळे मानसिक तणावात असलेल्या पतीने आत्महत्या केल्याचा आरोप

  • या प्रकरणात शिक्षिका आणि संबंधित विद्यार्थ्यावर गुन्हा दाखल

  • पोलिस तपास सुरू आहे.

चंदिगढमध्ये शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी बातमी समोर आली आहे. एका ३३ वर्षीय शिक्षिकेच २० वर्षीय विद्यार्थ्यावर प्रेम जडल होत. धक्कादायक म्हणजे या महिला शिक्षिकेच पहिलं लग्न झालं होत. या पहिल्या लग्नापासून महिलेला ६ वर्षांची मुलगी होती. महिलेच्या प्रेम संबंधाला कंटाळून तिच्या पतीने आत्महत्या केली. या घटनेने कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. याप्रकरणी महिला शिक्षिकेवर आणि तिच्या कथित प्रियकरावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीची पत्नी खासगी शिकवणी घेत होती. तिच्याकडे खासगी क्लासला येणाऱ्या एका विद्यार्थ्यासोबत तिचे कथित प्रेमसंबंध असल्याचे समोर आले. ही बाब समजल्यानंतर पती मानसिकदृष्ट्या खचला. त्याने पत्नीला समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र ती माहेरी निघून गेल्यानंतर तो एकटा पडला.पत्नीच्या अशा वागण्याला तो कंटाळला होता. त्याने एका डायरीत एक ओळ लिहून ठेवली होती. पत्नी माहेरी गेल्यानंतर त्याने जीवनयात्रा संपवली आणि कुटुंबीयांमध्ये एकच खळबळ उडाली. याप्रकरणी पोलिसात माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरु केला.

CHANDIGARH TEACHER BOOKED AFTER HUSBAND'S SUICIDE AMID ALLEGED AFFAIR WITH STUDENT
Health Care : सकाळी उठल्यानंतर अंगदुखी जाणवते? झोपण्यापूर्वी 'हे' ६ उपाय नक्की करा

पोलिसांना घटनास्थळावरून एक डायरी मिळाली असून त्यामध्ये ७ जुलै रोजी स्वतःसोबत घडलेल्या एका घटनेचा उल्लेख आहे. मात्र, त्याबाबत अधिक काही लिहिलेले नाही. तसेच काही व्हिडिओ आणि इतर डिजिटल पुरावेही पोलिसांच्या हाती लागले असून त्याच्या आधारे पुढील तपास सुरू आहे.

CHANDIGARH TEACHER BOOKED AFTER HUSBAND'S SUICIDE AMID ALLEGED AFFAIR WITH STUDENT
Health Care : तुम्ही दररोज किती चमचे तेल खाताय? 'ही' मर्यादा ओलांडल्यास वाढू शकतो हृदयविकाराचा धोका

मृताच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे की, संबंधित महिलेला आपल्या विद्यार्थ्यासोबत राहायचे होते. काही दिवसांपूर्वी संबंधित विद्यार्थी काही जणांसह त्यांच्या घरी येऊन वाद घालून गेला होता, असा आरोपही त्यांनी केला आहे. तसेच सहा वर्षांच्या मुलीला भेटण्यासाठी गेलेल्या मृत व्यक्तीला सासरच्या मंडळींकडूनही अपमानास्पद वागणूक मिळाल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणातील सर्व बाजूंची सखोल चौकशी सुरू केली असून नेमके काय घडले, याचा तपास सुरू आहे. अधिकृत तपास पूर्ण झाल्यानंतरच संपूर्ण सत्य स्पष्ट होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com