Pune Accident News: लोणीकंद-थेऊर अष्टविनायक महामार्गावर भीषण अपघात; तिघे मृत्यूमुखी, एकाची मृत्यूशी झुंज

या अपघातामुळे पाच किलाेमीटर पर्यँत दोन्ही बाजूनी मोठी वाहतूक कोंडी झाली होती. लोणीकंद पोलिस व लोणी वाहतूक विभागाने दोन्ही वाहने बाजूला करुन कोंडी दूर केली.
three died in road accident at lonikand theur ashtavinayak highway
three died in road accident at lonikand theur ashtavinayak highwaySaam Digital

- नितीन पाटणकर

Pune :

लोणीकंद-थेऊर अष्टविनायक महामार्गावर बकोरी फाट्याजवळ रविवारी जोगेश्वरी मंदीरा समोर कंटेनर व कार मध्ये समोरासमोर जोरदार धडक झाली. या धडकेत सात जण जखमी झाले हाेते. यापैकी तिघांचा मृत्यू झाला. या अपघातामधील गंभीर जखमीची मृत्यूशी झुंज सुरु असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार विनोद भोजणे, विठ्ठल जोगदंड आणि गणेश जाधव अशी मृतांची नावे आहेत. (Maharashtra News)

रविवारी रात्रीच्या सुमारास लोणीकंद-थेऊर या अष्टविनायक महामार्गावर हा अपघात झाला हाेता. या भीषण अपघातात कारचा चक्काचूर झाला. या घटनेनंतर जखमींना तातडीने वाघोली व खराडी येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

three died in road accident at lonikand theur ashtavinayak highway
PM Modi In Karad : उदयनराजेंच्या प्रचारार्थ पंतप्रधान मोदींची आज कराडमध्ये सभा; जाणून घ्या वाहतूक बदलासह पार्किंगची व्यवस्था, Video

या अपघातात कारचा चालक अपघातग्रस्त गाडीतच अडकून पडला होता. लोणीकंद पोलिस व स्थानिक नागरिकांनी त्याला बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. दरम्यान अपघातामधील तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

छाेटे माेठे अपघात घडताहेत

जोगेश्वरी मंदिरा समोर मोठे वळण आहे. वनविभागाने तेथे संरक्षक जाळी बसविल्याने वळण तीव्र झाले आहे. यामुळे तेथे नेहमी छोटे मोठे अपघात होत असल्याचे तेथील रहिवासी व माहिती अधिकारी कार्यकर्ते चंद्रकांत वारघडे यांनी सांगितले.

Edited By : Siddharth Latkar

three died in road accident at lonikand theur ashtavinayak highway
Ulhasnagar Crime News : 2 वर्षांपासून पोलिसांना देत होता चकवा; अखेर गुंड हितेंद्र ठाकूरला गुजरातमध्ये अटक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com