Karjat crime : कर्जतमधील बैलगाडा शर्यत मैदानावर आढळला तरुणाचा मृतदेह; हत्येनंतर चेहऱ्यावर टाकलं अॅसिड

Latest crime news from Karjat : रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात एका ३० वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करून ओळख लपवण्यासाठी त्याच्या चेहऱ्यावर ॲसिड टाकल्याची धक्कादायक नेवाळी गावातील बैलगाडी शर्यतीच्या मैदानावर घटना घडली आहे.
Latest crime news from Karjat Raigad district body recovered
Latest crime news from Karjat Raigad district body recoveredsaam tv
Published On: 

सचिन कदम

रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात एका ३० वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ओळख लपवण्याच्या उद्देशाने मारेकऱ्यांनी तरुणाच्या चेहऱ्यावर ॲसिड टाकून तो विद्रूप केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कर्जत तालुक्यातील नेवाळी गावातील बैलगाडी शर्यतीच्या मैदानावर या तरुणाचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मृत तरुणाचे नाव रोहित संजय ढोले ( ३०) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रोहित नेवाळी गावात एका हळदी समारंभासाठी आला होता. रात्रीच्या सुमारास त्याला कोणाचा तरी फोन आला. त्यानंतर तो घरातून बाहेर पडला. मात्र, रात्र उलटून पहाट झाली तरी तो घरी परतला नाही. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांना चिंता वाटू लागली आणि त्यांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली.

Latest crime news from Karjat Raigad district body recovered
Political News : महिला IAS अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून सत्ताधारी पक्षाच्या आमदाराला अटक; 11 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

दरम्यान, सकाळी नेवाळी येथील बैलगाडी शर्यतीच्या मैदानावर रोहितचा मृतदेह आढळून आला. त्याच्या शरीरावर मारहाणीच्या गंभीर खुणा होत्या. तसेच चेहऱ्यावर ॲसिड टाकून तो विद्रूप करण्यात आल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे रोहितची हत्या करून त्याची ओळख लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे.

घटनेची माहिती मिळताच कर्जत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपासाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. रोहितला रात्री नेमका कोणाचा फोन आला होता, तो घराबाहेर कोणाला भेटण्यासाठी गेला होता का आणि या हत्येमागे कोणते कारण आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.

Latest crime news from Karjat Raigad district body recovered
Kalyan News : सासूच्या भांडणाचा जाब विचारल्याचा राग अनावर झाला; पाय फ्रॅक्चर होईपर्यंत जावयाला मारहाण

या प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू असून, हत्येमागील नेमके कारण आणि घटनाक्रम तपासाअंती स्पष्ट होणार आहे. या निर्घृण हत्येमुळे कर्जत परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.