Kalyan News : सासूच्या भांडणाचा जाब विचारल्याचा राग अनावर झाला; पाय फ्रॅक्चर होईपर्यंत जावयाला मारहाण

Kalyan crime update : कल्याणमध्ये सासूशी झालेल्या भांडणाचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या जावयाला चौघांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. म्हात्रे नाक्यापासून सुरू झालेला हा वाद चिंचपाड्यापर्यंत पोहोचला.
Latest crime news from Kalyan regarding family feud and brutal assault
Latest crime news from Kalyan regarding family feud and brutal assault saam tv
Published On: 

संघर्ष गांगुर्डे, कल्याण

सासूशी झालेल्या भांडणाचा जाब विचारणे एका जावयाला चांगलेच महागात पडले आहे. जाब विचारण्यासाठी गेलेल्या जावयाला चौघांनी मिळून बेदम मारहाण केल्याची घटना कल्याण पूर्वेत घडली आहे. विशेष म्हणजे, म्हात्रे नाका येथे सुरू झालेला वाद थेट चिंचपाड्यातील चेरोबा चौकापर्यंत पोहोचला.

आरोपींनी सुनील ठाकूर यांना दुचाकीवरून चेरोबा चौकात नेले. तेथे खाली पाडून लोखंडी रॉडने डाव्या पायावर जोरदार प्रहार केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात सुनील यांचा पाय फ्रॅक्चर झाला असून या प्रकरणी चौघांविरोधात कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Latest crime news from Kalyan regarding family feud and brutal assault
Dhule : धक्कादायक! हॉटेलच्या परिसरात आढळला मृतदेह, धुळ्यात त्या रात्री नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, सुनील ठाकूर यांच्या सासूचे काळू भंडारी आणि त्याचा मुलगा अमोल भंडारी यांच्यासोबत घटनेच्या एक दिवस आधी भांडण झाले होते. याच भांडणाचा जाब विचारण्यासाठी सुनील ठाकूर २३ नोव्हेंबर रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास कल्याण पूर्वेतील म्हात्रे नाका परिसरात गेले होते.

यावेळी जाब विचारण्यावरून दोन्ही बाजूंमध्ये वाद सुरू झाला. या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. अमोल भंडारी याने सुनील यांच्या डाव्या डोळ्यावर मारहाण केली, तर काळू भंडारी याने त्यांना चापटा मारल्याचा आरोप आहे. त्यानंतर चेतन भोईर आणि आणखी एका अनोळखी तरुणाला घटनास्थळी बोलावण्यात आले.

Latest crime news from Kalyan regarding family feud and brutal assault
माजी क्रिकेटपटू विनोद कांबळींच्या मदतीला एकनाथ शिंदे धावले! उपचारांसह मुलांच्या शिक्षणाचीही घेतली जबाबदारी

यानंतर चौघांनी मिळून सुनील ठाकूर यांना मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे. आरोपींनी त्यांना दुचाकीवरून चिंचपाडा येथील चेरोबा चौकात नेले. तेथे त्यांना खाली पाडून लोखंडी रॉडने डाव्या पायावर जोरदार मारण्यात आले. या हल्ल्यात त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून पाय फ्रॅक्चर झाला आहे.

या घटनेनंतर सुनील ठाकूर यांनी पोलिसांत धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून काळू भंडारी, अमोल भंडारी, चेतन भोईर आणि एका अनोळखी तरुणाविरोधात कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कोळसेवाडी पोलीस करत आहेत. सासूच्या भांडणाचा जाब विचारण्याचा शेवट जावयाच्या पायाला फ्रॅक्चर होण्यात झाल्याने परिसरात या घटनेची चर्चा सुरू आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.