माजी क्रिकेटपटू विनोद कांबळींच्या मदतीला एकनाथ शिंदे धावले! उपचारांसह मुलांच्या शिक्षणाचीही घेतली जबाबदारी

Eknath Shinde Takes Responsibility For Vinod Kambli: माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांना एकनाथ शिंदे यांचा मोठा आधार. कांबळी यांच्या संपूर्ण उपचारांचा खर्च आणि दोन्ही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी शिंदे यांनी स्वीकारली.
Vinod Kambli treatment
Vinod Kambli treatmentsaam tv
Published On: 

सूरज मसुरकर, साम टीव्ही

माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे. कांबळी यांच्या संपूर्ण उपचारांची जबाबदारी एकनाथ शिंदे यांनी स्वीकारली असून, त्यांच्या दोन्ही मुलांच्या शिक्षणाचा खर्चही उचलण्याचा निर्णय घेतला आहे. विनोद कांबळी यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान शिंदे यांनी कांबळी यांच्या प्रकृतीची आणि सध्याच्या परिस्थितीची माहिती घेतली. त्यानंतर त्यांच्या संपूर्ण उपचारांचा खर्च उचलण्याची जबाबदारी स्वीकारली.

Vinod Kambli treatment
India vs New Zealand: मॅट हेन्री भारताला नडला! पत्त्यांसारखी कोसळली टीम इंडिया, न्यूझीलंडकडून 244 रन्सने पराभव

कांबळी यांच्यावर ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात उपचार केले जाणार आहेत. याशिवाय त्यांच्या मुलांच्या शिक्षणात कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी दोन्ही मुलांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्चही एकनाथ शिंदे यांच्याकडून केला जाणार आहे.

Vinod Kambli treatment
India vs New Zealand: मॅट हेन्री भारताला नडला! पत्त्यांसारखी कोसळली टीम इंडिया, न्यूझीलंडकडून 244 रन्सने पराभव

दरम्यान, गेल्या काही काळापासून विनोद कांबळी यांना प्रकृतीच्या समस्यांसह आर्थिक अडचणींचाही सामना करावा लागत आहे. एकेकाळी आपल्या आक्रमक फलंदाजीने क्रिकेटविश्वात वेगळी ओळख निर्माण करणारे कांबळी गेल्या काही वर्षांपासून मर्यादित उत्पन्नाच्या साधनांमुळे अडचणीत असल्याचे समोर आले होते. आता त्यांच्या उपचारांची आणि मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारण्याच्या निर्णयामुळे कांबळी कुटुंबाला मोठा आधार मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.