India vs New Zealand: मॅट हेन्री भारताला नडला! पत्त्यांप्रमाणे गडगडली टीम इंडिया, न्यूझीलंडकडून 244 रन्सने पराभव

India New Zealand ODI: भारत विरुद्ध न्यूझीलंड चौथ्या वनडे सामन्यात टीम इंडियाचा 244 धावांनी दारुण पराभव झाला. न्यूझीलंडने 334 धावांचे लक्ष्य दिले होते. मात्र भारतीय संघ 89 धावांवर गारद झाला. मॅट हेन्रीने 27 धावांत 6 विकेट घेत न्यूझीलंडच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
India vs New Zealand
India vs New Zealandsaam tv
Published On: 

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या वनडे सिरीजमधील चौथा सामना आज माउंट माउंगानुईमधील बे ओव्हल मैदानावर खेळवण्यात आला. या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा तब्बल 244 रन्सने दारूण पराभव केलाय. न्यूझीलंडने भारतासमोर विजयासाठी 334 रन्सचं लक्ष्य ठेवलं होतं. पण या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडिया अवघ्या 89 रन्सवर गारद झालीये.

न्यूझीलंडच्या या दणदणीत विजयाचा शिल्पकार ठरला गोलंदाज मॅट हेन्री. त्याने अवघ्या 27 रन्स देत भारताचे 6 खेळाडू बाद केलेत. न्यूझीलंडचा विजय झाला असला तरीही भारत या सिरीजमध्ये 2-1 अशा आघाडीवर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.