Dhule : धक्कादायक! हॉटेलच्या परिसरात आढळला मृतदेह, धुळ्यात त्या रात्री नेमकं काय घडलं?

Dhule Crime News : धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात बाम्हणे गावाजवळ ४३ वर्षीय रावसाहेब पवार यांची दगडाने ठेचून हत्या. पोलिसांकडून संशयिताचा शोध आणि पुढील तपास सुरू आहे.
Dhule Crime News
Dhule Crime News AI Image
Published On: 

भूषण अहिरे, धुळे

धुळे जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शिंदखेडा तालुक्यातील बाम्हणे गावाजवळ एका ४३ वर्षीय व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, रावसाहेब शांताराम पवार असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. शिंदखेडा-दोंडाईचा मार्गावर असलेल्या हॉटेल तांडवच्या मागील बाजूस एका शेतात ही घटना घडली. अज्ञात व्यक्तीने रावसाहेब पवार यांच्या डोक्यावर दगडाने वार करून त्यांची हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शेतात मृतदेह आढळल्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.

Dhule Crime News
Gold Rate Today : सोनं अचानक इतकं कसं महागलं? सुवर्णनगरीत दरांची मोठी झेप; चांदीचीही जोरदार मुसंडी

घटनेची माहिती मिळताच दोंडाईचा पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराची पाहणी केली आणि घटनेशी संबंधित पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली. तसेच मृतदेह ताब्यात घेऊन पुढील वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. या हत्येनंतर संशयित व्यक्ती घटनास्थळावरून पळून गेल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पोलिसांनी संशयिताचा शोध घेण्यासाठी वेगवेगळी पथके तयार केली असून त्यांना तपासासाठी रवाना केले आहे. संशयिताचा शोध घेण्यासाठी परिसरातील माहिती आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे.

Dhule Crime News
Shocking : लग्नाचे आश्वासन देऊन २९ वर्षीय महिलेवर अत्याचार, माजी सरपंचावर गुन्हा दाखल

दरम्यान, रावसाहेब पवार यांची हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे करण्यात आली, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. हा वैयक्तिक वादातून घडलेला प्रकार आहे की हत्येमागे आणखी काही कारण आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे बाम्हणे गावासह शिंदखेडा आणि दोंडाईचा परिसरात चर्चेला उधाण आले आहे. आरोपीचा शोध घेऊन हत्येमागील नेमके कारण समोर आणण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर आहे. या प्रकरणाचा पुढील तपास दोंडाईचा पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.