Ravikant Tupkar Accident : मद्यधुंद ट्रक चालकाची मागून धडक, लोकवर्गणीतून दिलेल्या रविकांत तुपकरांच्या 'लोकरथ' गाडीचा अपघात

Ravikant Tupkar Accident : सध्या कर्जमुक्तीच्या मागणीवर राज्यभरात आक्रमक आंदोलन सुरू केलेले शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या वाहनाला मध्यरात्री १२.३० ते १ वाजेच्या दरम्यान वाशी तालुक्यातील पारगाव टोलनाक्यावर अपघात झाला.
Ravikant Tupkar car accident
Ravikant Tupkar car accidentSaam Tv News
Published On

संजय जाधव, साम टिव्ही

बुलढाणा : सध्या कर्जमुक्तीच्या मागणीवर राज्यभरात आक्रमक आंदोलन सुरू केलेले शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या वाहनाला मध्यरात्री १२.३० ते १ वाजेच्या दरम्यान वाशी तालुक्यातील पारगाव टोलनाक्यावर अपघात झाला. मद्यधुंद अवस्थेतील ट्रक ड्राइव्हरने भरधाव ट्रकने इनोव्हाला मागून धडक दिली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी तथा गंभीर दुखापत झाली नाही. गाडीतील दोघांना किरकोळ मार लागला आहे.

रविकांत तुपकर यांना लोकवर्गणीतून लोकांनी दिलेली 'लोकरथ' नामक इनोव्हा (क्रमांक MH 28 BQ 9999) पारगाव टोल नाक्यावर थांबलेली असताना मागून भरधाव वेगात आलेल्या साखरेने भरलेल्या ट्रकने (MH 44 U 1444) गाडीला जोरदार धडक दिली. ट्रकचालक अत्यंत मद्यधुंद अवस्थेत होता. या धडकेचा आवाज इतका जबरदस्त होता की स्फोट झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. गाडीतील मागील सीटवर बसलेले लोक अक्षरशः समोर फेकले गेले. या अपघातात सुदैवाने रविकांत तुपकर यांना कोणतीही दुखापत झाली नसून ते पूर्णतः सुरक्षित आहेत. मात्र, गाडीत त्यांच्यासोबत असलेले पीए कार्तिक सवडतकर आणि राजाराम जाधव यांना सौम्य मार लागला आहे. तर चालक अजय मालगे व तुपकरांचे सहकारी गजानन नाईकवाडे यांना कोणतीही दुखापत नाही.

Ravikant Tupkar car accident
Maharashtra Weather Update : राज्याला वादळी पावसाचा इशारा, पश्‍चिम महाराष्ट्रात ‘ऑरेंज अलर्ट’; IMDचा वेदर रिपोर्ट

ट्रकचालक हा दारूच्या नशेत होता, अपघातानंतर तो सारखे खोटे बोलत होता व माहिती लपवण्याचा प्रयत्न करत होता. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून चालकासह ट्रकमधील क्लिनरला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून साखरेनं भरलेला ट्रकही जप्त करण्यात आला आहे. हा अपघात होता की घातपाताचा प्रयत्न? याबाबत अनेक शंका उपस्थित होत असून पोलिसांकडून दोन्ही बाजूंनी सखोल तपास सुरू करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास वाशी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संग्राम थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

रविकांत तुपकर हे राज्यात कर्जमुक्ती मागणीच्या दौऱ्यावर आहेत. नुकतेच त्यांनी नाशिक, परभणी, बीड येथील दौरे पूर्ण केले असून काल अंबाजोगाई तालुक्यातील देवळा येथे ‘कर्जमुक्ती एल्गार सभेला संबोधित केले. सभा आटोपून त्यांनी लातूर जिल्ह्यातील तांदुळजा येथे कार्यकर्त्यांसोबत स्नेहभोजन घेतलं व त्यानंतर रात्री ११ वाजता जालन्याच्या दिशेने ते मार्गस्थ झाले असताना वाशीजवळ हा अपघात घडला.

Ravikant Tupkar car accident
Maharashtra Politics : पवार-ठाकरेंनंतर आंबेडकरी एकत्र? रामदास आठवले आणि प्रकाश आंबेडकरांच मनोमिलन होणार? पाहा स्पेशल व्हिडिओ

या अपघातामुळे संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये राज्यभर मोठी खळबळ उडाली होती. मात्र, तुपकर हे पूर्णतः सुरक्षित असल्याचं समजताच सर्व कार्यकर्त्यांनी सुटकेचा निश्वास घेतला. या अपघाताचे गांभीर्य लक्षात घेता संबंधित यंत्रणांकडून सखोल व सर्व बाजूंनी चौकशी व्हावी अशी मागणी क्रांतिकारी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून होत आहे. ट्रकचालक संभाजी डोंगरे (पंढरपूर) याच्यावर वाशी पोलीस स्टेशनला कलम २८१,कलम १८५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ही कायदेशीर प्रक्रिया सकाळी ५ वाजेपर्यंत चालू होती.

Ravikant Tupkar car accident
Fact Check : हेअर ट्रान्सप्लांट कराल तर जीवानं जाल? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय? पाहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com