Fact Check : हेअर ट्रान्सप्लांट कराल तर जीवानं जाल? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय? पाहा VIDEO

Fact Check about Hair transplant : तुम्ही हेअर ट्रान्सप्लांट करण्याचा विचार करत असाल तर सावध व्हा...कारण, हेअर ट्रान्सप्लांट करणं जीवावर बेतू शकतं...हेअर ट्रान्सप्लांट केल्याने दोघांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आलाय...पण, हा दावा खरा आहे का...? याची आम्ही पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...
Hair Transplant
Hair TransplantSaam Tv
Published On

हेअर ट्रान्सप्लांट करताय तर ही बातमी पाहा...कारण, हेअर ट्रान्सप्लांट करणं दोन तरुणांच्या जीवावर बेतलंय...आपण सुंदर दिसावं असं प्रत्येक तरुण-तरुणीला वाटत असतं...त्यामुळे अनेकजण डोक्यावर केस नाहीत असे तरुण अलीकडे सर्रासपणे हेअर ट्रान्सप्लांट करू लागलेयत...मात्र, हेच हेअर प्लांट जीवघेणंही ठरू शकतं असा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय...हेअर ट्रान्सप्लांट केल्यामुळे दोन तरुणांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आलाय...अनेक जण हेअर ट्रान्सप्लांट करतात त्यामुळे हा दावा खरा आहे का? खरंच हेअर प्लांटमुळे कोणाचा मृत्यू झालाय का? असे सवाल उपस्थित होतायत...त्यामुळे व्हायरल मेसेजची आम्ही पडताळणी केली...त्याआधी या मेसेजमध्ये नेमका काय दावा केलाय पाहुयात...

Hair Transplant
Beed News : जीवाची भीक मागितली, हात जोडून गयावया केलं; बीड हादरवणारा आणखी एक व्हिडिओ समोर

व्हायरल मेसेजमध्ये म्हटलं आहे की,'हेअर ट्रान्सप्लांट शस्त्रक्रियेनंतर दोघांचा मृत्यू झाला.शस्त्रक्रियेनंतर चेहऱ्याला सूज आली आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला'. हा मेसेज व्हायरल होत असल्याने अनेकांची चिंता वाढलीय...खरंच हेअर ट्रान्सप्लांट जीवघेणं ठरू शकतं का? अशी ट्रीटमेंट सुरू असताना कुणाचा मृत्यू झालाय का? याची आम्ही पडताळणी केली त्यावेळी पोलिसांकडून अधिक माहिती मिळाली.

Hair Transplant
Delhi Politics : अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का; पक्षातील १५ शिलेदारांनी साथ सोडली, दिल्लीत 'ठाकरे' पॅटर्न

सध्या पोलीस तपास करतायत...मात्र, तुम्हाला जर हेअर ट्रान्सप्लान्ट करायचं असल्यास काय काळजी घ्यायला हवी...याबाबत आम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेतला...

त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात...

व्हायरल सत्य

कानपूरमध्ये हेअर ट्रान्सप्लांटमुळे दोघांचा मृत्यू झाला

ट्रिटमेंटमुळे दोघांच्याही चेहऱ्यावर सूज आली

अचानकपणे त्यांची तब्येत बिघडून मृत्यू झाला

भारतात दरवर्षी दीड ते 2 लाख लोक हेअर ट्रान्सप्लांट करतात

नवीन तंत्रज्ञानामुळे हेअर ट्रान्सप्लांट करणाऱ्यांची संख्या वाढली

Hair Transplant
Thane : नाशिकला जाणाऱ्यांसाठी मोठी बातमी; पुढील ९ दिवस ठाण्यातील वाहतूक मार्गात बदल, पर्यायी मार्ग काय?

सुंदर दिसण्यासाठी अनेक तरुण हेअर ट्रान्सप्लांटची ट्रिटमेंट घेतात...मात्र कानपूर मधल्या घटनेमुळे सर्वांच्याच पायाखालची वाळू सरकलीय...आमच्या पडताळणीत हेअर ट्रान्सप्लांट मुळे दोन तरुणांचा मृत्यू झाल्याचा दावा सत्य ठरलाय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com