Crime News: हळदीच्या दिवशी विपरित घडलं; दोन वधू बहिणींचा संशयास्पद मृत्यू; तांत्रिक कनेक्शनमुळे परिसरात खळबळ

Two Sisters Found Dead : लग्नाच्या दोन दिवसा आधीच बहिणींच्या संशयास्पद मृत्यूमुळे खळबळ उडालीय आहे. पोलीस खून आणि आत्महत्येच्या दोन्ही दृष्टिकोनातून या प्रकरणाचा तपास करत आहेत.
Two Sisters Found Dead
Police investigate the house in Jodhpur’s Sursagar where two sisters were found dead before their wedding ceremony.saam tv
Published On
Summary
  • जोधपुरच्या सूरसागरमध्ये लग्नाआधी दोन बहिणींचा संशयास्पद मृत्यू.

  • कुटुंबीयांचा तांत्रिक कनेक्शन आणि दबावाचा आरोप.

  • पोलिसांकडून हत्या आणि आत्महत्या या दोन्ही कोनातून तपास.

घरात लग्नाची धामधूम, मेहंदीच्या रात्री सर्व वऱ्हाडींचं नाचगाणं सुरू होतं. घरातील दोन बहिणींना एकाच दिवशी हळद लागणार होती. सर्वत्र आनंदाचं वातावरण होतं. कोणी हातावर मेहंदी काढत होतं, तर कोणी गाण्यावर डान्स करण्यात मग्न होते. घरात आणि अंगण पाहुण्यांनी भरलेलं. मेहंदीच्या दुसऱ्या दिवशी पहाटेच्या ३ वाजता सारं विपरित घडलं. दोन्ही नवऱ्या मुलींचा मृत्यू झाल्याची बातमी पाहुण्यांच्या कानावर आली. क्षणार्धात घरातील वातावरण बदललं. गाण्याऐवजी आरडाओरड सुरू झाली. जे आदल्या रात्री जे हसत होते, ते मोठंमोठ्याने रडू लागले. ही धक्कादायक घटना घडलीय जोधपूरच्या सुरसागर भागात .

Two Sisters Found Dead
Solapur Crime : "जीव होता तो माझा..." विवाहितेने आयुष्याचा दोर कापला, हातावर मन सुन्न करणारा मजकूर अन्...

मेहंदीच्या रात्री अनेकांना धक्का बसला. घरात लग्न समारंभाची तयारी सुरू होती. मेहंदीच्या दिवशी संगिताचा कार्यक्रम चालू होता, त्याचवेळी आनंदावर विरजण पडलं. लग्नाच्या गाण्याऐवजी घरात शांतता आणि रडण्याचा आवाजाने दणाणून गेले. संशयास्पद दोन वधू बहिणींचा मृत्यू झाल्याने अनेकांना धक्का बसलाय.

Two Sisters Found Dead
Shocking : भयंकर! बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या प्रायव्हेट पार्टवर सॅनिटायझर टाकले अन् आग लावली, त्यानंतर...

घटनेच्या रात्री घरात आनंदाचे वातावरण होते. मेहंदीचा कार्यक्रम सुरू होता, नाचगाणे चालू होते. मात्र हळदीच्या दिवसाच्या पहाटे ३ वाजता अचानक दोन बहिणीचा मृत्यू झाल्याच्या बातमीने अनेकांच्या पायाखालची जमीन सरकरली. धक्कादायक गोष्ट म्हणजे, पोलिसांना तात्काळ कळवण्याऐवजी, कुटुंबातील व्यक्ती सकाळपर्यंत मृतदेह घेऊन बसले. सकाळी वधूच्या मामांना ही बातमी मिळाली त्यांनी पहाटे ५ वाजता पोलिसांना याची माहिती दिली.

मृत बहिणींचे मामा आणि आई यांनी या घटनेबद्दल गंभीर आरोप केले आहेत, यामुळे हे प्रकरण आणखी गुंतागुंतीचे झालं. बहिणींचे पूर्वी दुसऱ्या कोणाशी तरी लग्न झाले होते, परंतु त्यांचे लग्न अचानक मोडून दुसरीकडे ठरवण्यात आले होते. या निर्णयामुळे त्या नाराज झाल्या का? जेव्हा तिच्या मुलींची तब्येत बिघडली तेव्हा त्यांना रुग्णालयात नेण्याऐवजी रात्रभर जादूटोणा करणाऱ्या तांत्रिकाकडे नेलं, असा आरोप मृत मुलींच्या आईनं केलाय.

आणखी एक आर्श्चयाची गोष्ट म्हणजे, दोन्ही बहिणींचे सोशल मीडिया अकाउंट खाली करण्यात आले आहे, त्यामुळे कुटुंबाने चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी त्यांचे वडील, काका आणि भावाच्या फोनची एफएसएल तपासणी आणि डेटा रिकव्हरीची मागणी केली आहे.

सूरसागर येथील पोलिसांनी मृतदेह महात्मा गांधी रुग्णालयातील शवागारात ठेवले आहेत. पोलिसांसमोर आता सर्वात मोठे आव्हान आहे की ही सामूहिक आत्महत्या होती की कट रचला गेला होता. जर ती आत्महत्या असेल तर त्यामागचा हेतू काय होता? जर ती हत्या असेल तर त्यामागचा हेतू काय होता? रात्रभर पोलिसांपासून हे प्रकरण का लपवून ठेवण्यात आले? असे प्रश्न नागिरकांना पडलेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com