गुरुग्राममध्ये १९ वर्षीय तरुणीवर प्रियकराकडून गंभीर अत्याचाराचा आरोप
ऑनलाइन ओळखीचे नाते हिंसक वादात बदलल्याचे समोर
पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली
प्रकरणामुळे परिसरात खळबळ; पोलिसांकडून पुढील तपास सुरू
दिल्लीच्या गुरुग्राममध्ये एका १९ वर्षीय मुलीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये तिच्या प्रियकराने सॅनिटायझर टाकून आग लावली असल्याची संतापजनक घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे या तरुणाने संशयातून हे कृत्य केले असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी तरुणीने पोलीस ठाण्यात प्रियकराविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात केले आहे. या संतापजनक घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी या दोघांची ओळख एका ऑनलाइन अॅपद्वारे झाली मूळची त्रिपुराची राहणारी पीडिता गुरुग्राममधील सेक्टर ६९ मध्ये पीजीमध्ये राहत असताना बायोटेक्नॉलॉजीमध्ये बी.एससी. करत होती. यादरम्यान तिची भेट दिल्लीतील नरेला येथील रहिवासी शिवमशी ऑनलाइन अॅपद्वारे झाली.
सप्टेंबर २०२५ मध्ये त्यांनी एकमेकांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आणि नंतर दोघे एकमेकांना भेटू लागले. शिवमने लग्नाच्या बहाण्याने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले असा पीडितेचा आरोप आहे. काही काळानंतर ते गुरुग्राममध्ये एकत्र राहू लागले. या काळात आरोपीला तिच्यावर संशय आला आणि त्याने तिच्यावर अत्याचार केले. सुरवातीला तरुणाने तिला मारहाण केली. मात्र काही दिवसांनी आरोपीने क्रूरतेची हद्द पार केली.
आरोपीने १६ फेब्रुवारी २०२६ रोजी तिच्यावर गंभीर हल्ला केला. त्याने स्टीलच्या बाटलीने तिच्या डोक्यावर वार केले आणि तिचे डोके भिंतीवर आणि फर्निचरवर आपटले. त्यानंतर तिला मातीच्या भांड्याने मारहाण करण्यात आली. आरोपीने तिच्या गुप्तांगांवर सॅनिटायझर ओतले आणि त्यांना आग लावण्याचा प्रयत्न केला आणि तिच्या पायांवर चाकूने वार केले असाही तिने आरोप केला आहे. शिवाय या घटनेचं चित्रीकरण देखील केलं. याप्रकरणी तरुणीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तरुणीच्या तक्रारीवरून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.