Crime News: सतत मोबाईलवर व्यस्त! रागाच्या भरात पतीने पत्नीच्या केली हत्या, स्वत:ला घेतले पेटवून

Husband Killed Wife: राजस्थानमध्ये पत्नीवर नाराज झालेल्या पतीने कुऱ्हाडीने तिचा शिरच्छेद करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पत्नी फोनवर व्यस्त असल्याने संतापलेल्या पतीनं असं पाऊल उचललं आहे.
Husband Killed Wife
Husband Killed WifeYandex
Published On

Latest Crime News

पती-पत्नीमध्ये वाद होणं ही सामान्य गोष्ट आहे. भांडण झाल्यावर एकमेकांशी न बोलणंही सामान्य गोष्ट आहे. पण या परस्पर भांडणामुळे एकमेकांचा जीव गेला तर? राजस्थानमध्ये (Rajasthan) अशीच एक घटना घडली आहे. पत्नी सतत फोनवर व्यस्त असल्यानं संतापलेल्या पतीने कुऱ्हाडीने पत्नीचा शिरच्छेद केल्याची समोर आली आहे. (Latest Crime News)

ती गाढ झोपेत असताना आरोपी पतीने तिच्यावर हल्ला केला. यावेळी पतीने पत्नीवर कुऱ्हाडीने वार केले. आरोपीने हल्ला करताच पत्नी जोरजोरात ओरडू लागली. त्यानंतर पतीने पळून जाऊन स्वत:ला पेटवून (Husband Attempt End His Life) घेतले. या घटनेत पत्नीचा मृत्यू झाला तर आरोपी पती गंभीररित्या भाजला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

काय आहे घटना?

राजस्थानमधील बांसवाडा जिल्ह्यातील दानपूर पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडली आहे. रात्री ३ वाजण्याच्या सुमारास पतीने झोपलेल्या पत्नीच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार (Husband Killed Wife) केले. एकदा कुऱ्हाड मारूनही आरोपीचे समाधान न झाल्याने त्याने आणखी दोनदा हल्ला केला.

दानपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी राजवीर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुनिया खेडी येथील ४५ वर्षीय राजू आणि त्याची पत्नी नानी यांच्यात मोबाईल फोन वापरण्याच्या मुद्द्यावरून (Wife Stays Busy On Phone) बराच वेळ भांडण झालं होतं. याचा पती राजूला खूप राग आला. रात्री झोपेत असताना आरोपी राजू याला 3 वाजता जाग आली. त्याने गाढ झोपलेल्या पत्नीवर कुऱ्हाडीने वार करून तिचा शिरच्छेद केला. पोलिसांनी सांगितले की, जेव्हा आरोपी पतीने पत्नीच्या डोक्यावर मारले तेव्हा पत्नीने आरडाओरडा केला, त्यादरम्यान त्यांचा 5 वर्षांचा मुलगा उठला. त्यानंतर आरोपी राजू घरातून पळून गेला.

Husband Killed Wife
Crime News : मिठाईवरून पती-पत्नीमध्ये जोरदार भांडण; 7 फेरे घेतल्यानंतर मोडलं लग्न

पतीनं उचललं टोकाचं पाऊल

आरोपीने घरापासून काही अंतरावर असलेल्या गवताळ परिसरात स्वतःला पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. जेव्हा त्याचे पाय भाजू लागले, तेव्हा तो ओरडू लागला. त्यामुळे आजूबाजूचे लोक जागे (Crime News) झाले. आजूबाजूच्या लोकांनी आरोपी राजूला गवतातून बाहेर काढले. खोलीत पाहिल्यावर त्याची पत्नीही गंभीर अवस्थेत पडल्याचं त्यांना दिसलं.

जखमी अवस्थेत पत्नी व पतीला जवळच्या रुग्णालयात नेले असता पत्नीचा मृत्यू झाला. आरोपी राजूवरही उपचार सुरू आहेत. हल्ल्यात वापरलेली कुऱ्हाड जप्त करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. अहवाल आल्यानंतर पोलिसांनी मृत महिलेचे शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला आहे. पोलीस पुढील तपास करत आहे.

Husband Killed Wife
Chakan Crime : डोक्यात दगड टाकून घेतला मित्राचा जीव; दहशतीसाठी घटनेचा व्हिडीओ केला व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com