Chakan Crime : डोक्यात दगड टाकून घेतला मित्राचा जीव; दहशतीसाठी घटनेचा व्हिडीओ केला व्हायरल

Crime News : हल्लेखोर एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी तरुणाची हत्या केल्यानंतर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. हत्येचा थरार या नराधमांनी आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केला.
Chakan Crime
Chakan CrimeSaam TV
Published On

Chakan:

चाकण औद्योगिक क्षेत्रात अल्पवयीन मुलाच्या डोक्यात दगड टाकुन खुन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत.

Chakan Crime
Indian Student Killed In America: आणखी एका भारतीय विद्यार्थ्याची अमेरिकेत हत्या, आठवड्यात तीन विद्यार्थ्यांनी गमावला जीव

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, हल्लेखोर एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी तरुणाची हत्या केल्यानंतर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. हत्येचा थरार या नराधमांनी आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केला. हा थरारक व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर देखील पोस्ट केला. चाकण परिसरातील अशा क्रूर घटनांमुळे अल्पवयीन गुन्हेगारीच्या टोळ्यांना आळा घालण्याचे मोठे आवाहन पोलिसांसमोर उभे राहिले आहे.

पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, चाकणमधील आंबेठाण रोडवर पाच मित्र एकत्र रोडलगत बसले होते. यावेळी त्यांच्यात एकमेकांमध्ये वर्चस्वावरुन वाद झाला. या वादात एका अल्पवयीन मुलांने थेट दुसऱ्या मुलाच्या डोक्यात दगड टाकत त्याचा खुन केला. तसेच आपल्या दुसऱ्या एका मित्राला याचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यास सांगितले. व्हिडीओमध्ये मित्राच्या निघृण खुन करत माझ्यात दम आहे, असा संदेश आरोपीने दिला आहे.

सदर घटनेत खुन झालेल्या मुलगा जामीनावर बाहेर आला होता. खेड सेझ प्रकल्पात उद्योजक आणि माजी सरपंचाची गोळ्या घालून हत्या केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता. एक महिन्यापूर्वी त्याची जामीनावर सुटका झाली होती.

सध्या खुनाचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे. त्यामुळे अल्पवयीन मुलांमधील टोळ्या सक्रिय होत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याने चाकण पोलिसांसमोर मोठं आवाहन उभं आहे.

Chakan Crime
Sakri Crime : यात्रेत मुलीसोबत फिरत असल्याचे पत्नीला सांगितल्याचा राग; मेहुण्याकडून शालकाचा केला खून

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com