Indian Student Killed In America: आणखी एका भारतीय विद्यार्थ्याची अमेरिकेत हत्या, आठवड्यात तीन विद्यार्थ्यांनी गमावला जीव

Indian Student Killed In America News: अमेरिकेत आणखी एका भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. अमेरिकेतील सिनसिनाटी येथे एका भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली असून, आठवडाभरात तीन विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे.
Indian Student Killed In America
Indian Student Killed In AmericaSaam Digital
Published On

Indian Student Killed In America

अमेरिकेत आणखी एका भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. अमेरिकेतील सिनसिनाटी येथे एका भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली असून, आठवडाभरात तीन विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. जानेवारीमध्ये विवेक सैनी नावाच्या २५ वर्षीय विद्यार्थ्याने नुकतेच अमेरिकेत एमबीए पूर्ण केले होते. तो या जीवघेण्या हल्ल्याचा बळी ठरला. इंडियाना येथील पर्ड्यू विद्यापीठात नील आचार्य हा भारतीय विद्यार्थीही गेल्या आठवड्यात मृतावस्थेत सापडला होता.

विवेक सैनीची ड्रगच्या व्यसनाने ग्रस्त आणि बेघर ज्युलियन फॉकनरने निर्घृणपणे हत्या केली होती. विवेक त्याला हत्येच्या काही दिवस आधी मदत करत होता. विवेक जॉर्जिया येथील एका सुविधा स्टोअरमध्ये अर्धवेळ काम करतो. 16 जानेवारी रोजी रात्री उशिरा ही घटना घडली त्यावेळी विवेकने फॉकनरला जागा रिकामी करण्यास सांगितले होते.

मद्यधुंद अवस्थेत हत्या

मिळालेल्या माहितीनुसार विवेक ज्या फूड मार्टमध्ये काम करत होता तेथील कर्मचारी अनेक दिवस फॉकनरला मदत करत होते. विनंती केल्यावर त्याला नाश्ता, पेये आणि एक जॅकेटही पुरवत होते. असे असतानाही त्याने विवेकची हत्या केली.

Indian Student Killed In America
Income Tax Budget २०२४: अर्थसंकल्पात करदात्यांसाठी महत्त्वाची घोषणा; 1 कोटी करदात्यांना कसा होणार फायदा? जाणून घ्या

आरोपी दुकानात यायचा आणि विवेक त्याला सिगारेट द्यायचा. पण त्या दिवशी त्याने नकार दिला आणि तो माणूस पुन्हा त्रास देण्यासाठी आला तर पोलिसांना फोन करू, असे सांगितले. मात्र त्याने हातोड्याने डोक्यावर वार करून त्याची हत्या केली. लिथोनियामधील शेवरॉन गॅस स्टेशनवर झालेल्या हल्ल्याबद्दल अधिकाऱ्यांना मध्यरात्री कॉल आला. पोलीस घटनास्थळा दाखल झाले त्यावेळी फॉकनर विवेकच्या रक्ताने माखलेल्या मृतदेहाजवळ हातात हातोडा घेऊन उभा होता.

‘बेपत्ता’ भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला

जॉन मार्टिनसन ऑनर्स कॉलेजमधील कॉम्प्युटर सायन्स आणि डेटा सायन्समधील विद्यार्थी नील आचार्य सोशल मीडियावर बेपत्ता झाल्याची पोस्ट करण्यात आली होती. 29 जानेवारी रोजी सकाळी नील आचार्यचा मृतदेह परड्यूच्या कॅम्पसमध्ये आढळून आला.

Indian Student Killed In America
Jharkhand Political Crisis: राज्यपालांनी नाही दिलं सरकार स्थापनेचं आमंत्रण; आमदारांनी धरला हैदराबादचा रस्ता

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com