उत्तर प्रदेशातील आग्रा (Agra) येथे एक विचित्र घटना समोर आली आहे. पत्नीचं एका विचित्र कारणामुळं पतीसोबत भांडण झालं. हे भांडण थेट पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलं आहे. या भांडणाचं कारण ऐकल्यानंतर तुम्हीही हैराण व्हाल. या जोडप्याच्या भांडणामागे काय कारण आहे, ते आपण पाहू या. (Latest Crime News)
मोमोज हा अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. आपण मोमोजवरून भांडण झाल्याच्या अनेक घटना ऐकल्या आहेत. अशीच एक घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे. नवरा बायकोमध्ये चक्का मोमोजवरून भांडण (Husband Wife Dispute) झालंय. हे भांडण थेट पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलं आहे. नवरा बायकोत तशी छोटी मोठी भांडण होत असतात, परंतु हे प्रकरण जरा जास्तच गंभीर होतं.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
'असं' आहे प्रकरण
ही घटना आग्र्याच्या मालपुरा येथील आहे. नवऱ्याने बायकोला मोमोज खाऊ घालण्याचं वचन दिलं होतं. परंतु नवऱ्याने मोमोज खाऊ न दिल्याने हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलं (Husband Wife Dispute Over Momos) आहे. बायकोला मोमोज न खाऊ घातल्याने दोघांमध्ये मतभेद झाले आहेत. दोघांमधील हे भांडण पोलिसांपर्यंत पोहोचलं आहे.
या महिलेला मोमोज खायला फार आवडतं. तिनं लग्नापूर्वी ही गोष्ट तिच्या होणाऱ्या नवऱ्याला सांगितली होती. त्यानंतर लग्नानंतर तुला नेहमी मोमोज खायला घेऊन जाईल, असं वचन या व्यक्तीने आपल्या बायकोला दिलं होतं. त्यानंतर त्यांचं लग्न झालं. नवऱ्याने बायकोला वचन दिले होतं की, तो तिला आठवड्यातून दोनदा मोमोज खायला घेऊन (Husband Broke Momos Promise) जाईल. लग्नानंतर त्याने दिलेलं वचन पूर्ण केलं नाही.
मोमोजवरून नवरा बायकोत भांडण
यावरून दोघांमध्ये भांडण झालं. हा वाद इतका वाढला की बायकोने नवऱ्याविरोधात तक्रार करत पोलीस स्टेशन गाठले. त्यांच्या लग्नाला सहा महिने झाले आहेत. या महिलेच्या नवऱ्याचा बुट बनविण्याचा व्यवसाय आहे. बायको म्हणते की, तिला मोमोज (Momos) खूप आवडतात. जर तिला रोज मोमोज खायला मिळाले, तर ती खूप आनंदी राहु शकते.
पोलीस ठाण्यात ( Wife Complained Police Station) गेल्यानंतरही या जोडप्यातील वाद मिटला नाही. तेव्हा त्यांना समुपदेशन केंद्रात नेण्यात आलं. समुपदेशनानंतर नवरा बायकोमध्ये समझोता झाला. त्यामध्ये पती दर आठवड्यात एकदा पत्नीला मोमोज खाऊ घालणार, असं ठरलं आहे. तेव्हा त्यांच्यातील भांडण मिटलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.