सचिन कदम
राज्यात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांचं प्रमाण वाढलं आहे. त्यांना पकडण्यासाठी पोलीस प्रयत्न करत (Crime News) आहेत. रायगड जिल्ह्यासह सातारा आणि कांदीवली मुंबई येथील 10 मोटार सायकल चोऱ्यांचा छडा लागला आहे. या प्रकरणी तीन चोरांना अटक करण्यात आली आहे. (Latest Crime News)
लवकरच मोटर सायकल चोरांच्या (Motorcycle Thieves) मोठ्या टोळीचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे. फिल्मी स्टाईलमध्ये चोरांवर लक्ष ठेऊन पोलिसांनी ही कामगिरी केली आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
महाड पोलिसांची कामगिरी
फिल्मी स्टाईलमध्ये चोरांवर लक्ष ठेऊन आणि अर्धा किलोमीटर पाठलाग करीत महाड MIDC पोलिसांनी (Mahad MIDC Police) मोटर सायकल चोरांना बेड्या ठोकल्या आहेत. सागर सोळंकी (राहणार बिरवाडी), युवराज जगताप (वय 27 वर्ष राहणार साकडी) आणि सुहास नाईलकर (वय 26 वर्ष, राहणार रूपवली तालुका महाड) अशी आरोपींची नावं आहेत.
या कारवाईमध्ये तीन चोरट्यांकडून 10 मोटर सायकल आणि एक मोटर सायकलची चावी असा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. शोध मोहिमेत महाड, माणगावसह पाचगणी जिल्हा सातारा आणि कांदीवली मुंबई येथील मोटर सायकल चोऱ्यांचा छडा (Mahad MIDC Police Catch Motorcycle Thieves) लागला आहे. ही टोळी मोटर सायकलवर लक्ष ठेवायची. त्यानंतर मोटर सायकलचा लॉक, वायरिंग तोडून मोटर सायकल चोरी करायची.
मोठ्या टोळीचा पर्दाफाश होण्याची शक्यता
चोरी केल्यानंतर दुचाकीची बनावट नंबरप्लेट तसेच बनावट कागदपत्रं बनवून विक्री करीत होते. भिवंडी जिल्हा ठाणे, प्रतापगड जिल्हा सातारा, मंडणगड जिल्हा रत्नागिरी आणि महाड तालुक्यातील रूपवली, साकडी, कुसगाव, चिंभावे, महाड शहर येथुन चोरीला गेलेल्या मोटर सायकल पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत.
या प्रकरणी अजुनही तपास सुरु (Latest Crime News) आहे. मोटर सायकल चोरांच्या मोठ्या टोळीचा पर्दाफाश होण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवला जात आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.