Pune Crime: खळबळजनक! ८ वर्षाच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार करून हत्या, वाकड पोलीस स्टेशन हद्दीतील घटना

Minor Killed After Kidnapping: पुणे शहरात ८ वर्षाच्या चिमुकल्याची अपहरण करून हत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना वाकडमध्ये उघडकीस आली आहे.
Pune Crime
Pune CrimeSaam Tv
Published On

गोपाळ मोटघरे

Pune Crime News Eight Year Old Boy Killed

पिंपरी चिंचवड शहरातील वाकड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये (Wakad Police Station Area) एका आठ वर्षाच्या मुलाचं अपहरण करून निर्घृण खून करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहेत. याप्रकरणी वाकड पोलिसांनी संशयित आरोपीला (Wakad Police)ताब्यात घेतलं आहे. आपण या घटनेबद्दल सविस्तर जाणून घेऊ या. (Latest Crime News)

या आठ वर्षाच्या मुलाचं अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करण्याच्या हेतुने अपहरण करण्यात आलं होतं. हा मुलगा घरच्या अंगणात खेळत होता. तेव्हा आरोपींनी या मुलाचं अपहरण केलं. त्यानंतर त्याच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार (Minor Killed After Kidnapping) केले. अत्याचार केल्यानंतर त्याची हत्या केली. ही घटना वाकड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये घडली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अल्पवयीन मुलाचं अपहरण

शनिवारी रात्री या आठ वर्षाच्या मुलाचं अपहरण करून खून करण्यात आला आहे. या प्रकरणात वाकड पोलिसांनी पवन जोगेश्वरप्रसाद पांडे या संशयित आरोपीला अटक केली (Pune Crime) आहे. मृत मुलाचे वडील हे मुळचे मध्य प्रदेश राज्यांतील रहिवासी आहेत.

ते सध्या वाकड परिसरातील वीट भट्टी परिसरात कामानिमित्ताने पत्रा शेडच्या घरात राहत आहेत. त्याच ठिकाणी एका उसाच्या गुऱ्हाडावर पवन जोगेश्वरप्रसाद पांडे हा आरोपी कामानिमित्ताने रुजू झाला (Minor Killed) होता. पवन जोगेश्वरप्रसाद पांडे यानीच मृत मुलाचं अपहरण करून केल्याचं पोलीस तपासात उघडकीस आला आहे.

Pune Crime
Crime News: विकृतीचा कळस! मालाडमध्ये १० वर्षाच्या अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार

मुलावर अनैसर्गिक अत्याचार करून हत्या

पीडित मुलाचं अपहरण होण्याआधी तो पवन जोगेश्वरप्रसाद पांडेसोबत फिरत असल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. पवन जोगेश्वरप्रसाद पांडे यानी पीडित अल्पवयीन मुलाचं मुलाचं अगोदर अपहरण केलं. त्यानंतर त्याच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार (Physically Abused) केला. त्यानंतर त्याचा मृतदेह बावदान येथील कचऱ्याच्या टेकडीजवळ फेकून दिला होता.

घराजवळ खेळत असताना मुलगा अचानक बेपत्ता झाला. शोधाशोध करूनही मुलगा न सापडल्याने मृत मुलाच्या वडिलांनी वाकड पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. त्यांनी मुलगा बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली (Pune Crime News) होती. त्यानंतर पोलिसांनी शोध घेतला आणि ही घटना उघडकीस आली. या प्रकरणात वाकड पोलिसांनी पवन जोगेश्वरप्रसाद पांडे ह्या आरोपी विरोधात भादवी 302 आणि 377 कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. त्याला अटक केली आहे. आरोपीने घटनेची कबुली दिल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

Pune Crime
Crime News: शाळेजवळच दारू अड्डा, नशेखोरांना वैतागून बालवाडीच्या विद्यार्थ्याची न्यायालयात धाव

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com