Crime News: तरूणीने एकतर्फी प्रेमातून केलं टीव्ही अॅंकरच अपहरण; हैदराबादमधील खळबळजनक घटना

Woman Kidnapped TV Anchor: प्रेमासाठी काहीही, असं आपण ऐकतो. पण हैदराबादमध्ये याचा प्रत्यय आला आहे. एका तरूणीने आपल्या प्रेमापोटी चक्क टीव्ही अॅंकरचं अपहरण केल्याची घटना घडली आहे.
Crime News
Crime NewsGoogle

Hyderabad Crime News Matrimonial Fraud Case

प्रेमात लोकं काहीही करतात. प्रेम आंधळं असतं, असं म्हणतात. पण जेव्हा या प्रेमाचं वेडेपणात रूपांतर होतात, तेव्हा समस्या वाढतात. असाच एक प्रकार हैदराबादमध्ये (Hyderabad) समोर आला आहे. येथे एकतर्फी प्रेमात वेडी झालेल्या एका तरूणीने टीव्ही अॅंकरचं अपहरण केलं आहे. नक्की काय प्रकरण आहे, ते आपण सविस्तर जाणून घेऊ या. (Latest Crime News)

त्रिशा नावाच्या व्यावसायिक तरूणीनं टीव्ही अँकर प्रणवचं अपहरण केल्याची घटना घडली आहे. एकतर्फी प्रेमातून ( One Side Love) तिने हे पाऊल उचललं आहे. त्रिशा प्रणवला पसंत करत (Woman Kidnapped TV Anchor) होती. तिचं त्याच्यावर प्रेम होतं. या टीव्ही अँकरची प्रोफाइल मॅट्रिमोनिअल साइटवर सापडली होती. ती त्याला संदेश पाठवत होती, परंतु प्रणव तिला योग्य प्रतिसाद करत नव्हता.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

टीव्ही अॅंकरचं अपहरण केलं

ही तरूणी अँकरला (TV Anchor) संदेश पाठवत होती. कालांतराने प्रणवने तिचा नंबर ब्लॉक केला. त्यामुळे ती नाराज झाली होती. निराश झालेल्या त्रिशाला या अँकरशी लग्न करायचं होतं. त्यासाठी तिने या तरुणाचं अपहरण करण्याचा कट रचला होता. तिला वाटलं की, ती तरुणाचे अपहरण करून त्याच्याशी लग्न करेल आणि त्यानंतर सर्व काही ठीक होईल.

या अपहरणातून पळून गेल्यानंतर तरुणाने रचकोंडा पोलीस आयुक्तालयांतर्गत उप्पल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. तपासादरम्यान, पोलिसांनी आरोपी तरूणीसह चार जणांना (Hyderabad Crime) पकडले. या तरूणीने अँकरचे अपहरण करण्यासाठी चार जणांना सुपारी दिली होती. अटकेनंतर चौकशीत या तरूणीने प्रणवशी लग्न करायचं असल्यामुळे त्याचं अपहरण केल्याची कबुली दिली.

Crime News
Child Kidnapping News | नवी मुंबईत मुलं बेपत्ता होण्याचे प्रकार सुरूच, 24 तासात आणखी 3 मुलं बेपत्ता

पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

या तरूणीने अँकरचे अपहरण करण्यासाठी चार लोकांना कामावर ठेवलं होतं. प्रणवच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी त्याच्या कारमध्ये ट्रॅकिंग डिव्हाइस देखील बसवलं होतं. 10 फेब्रुवारी रोजी त्यांनी टीव्ही अँकरचे अपहरण केलं (Crime News) होतं. त्याला मारहाण देखील केली होती. पोलिसांनी सांगितलं की, आपल्या जीवाच्या भीतीने टीव्ही अँकर प्रणवने या तरूणीच्या कॉलला उत्तर देण्यास सहमती दर्शवली. त्यानंतरच गुंडानी त्याला सोडलं होतं.

या तरूणीने मॅट्रिमोनी साइटवर प्रणवचे प्रोफाइल शोधले होते. त्यात तिला प्रणवचा फोन नंबर मिळाला होता. तिने इन्स्टंट मेसेजिंग ॲपच्या माध्यमातून प्रणवशी संपर्क साधला. तेव्हा अँकरने तिला सांगितले की, कोणीतरी अज्ञात व्यक्तीने तिचा फोटो वापरला आहे. मॅट्रिमोनियल साइटवर तिचे कोणतेही प्रोफाइल (Matrimonial Fraud Case) नाही. साइटवर एक बनावट खाते तयार करण्यात आले आहे. याप्रकरणी सायबर क्राइम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

Crime News
Nashik Businessman Kidnapping : उद्योगपती हेमंत पारख यांचं नाशिकमधून अपरहण, सूरतजवळ सुटका; मधल्या प्रवासात नेमकं काय झालं?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com