Crime News: शाळेजवळच दारू अड्डा, नशेखोरांना वैतागून बालवाडीच्या विद्यार्थ्याची न्यायालयात धाव

LKG Student Reached Court: कानपूरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका एलकेजीच्या विद्यार्थ्याच्या शाळेजवळ मद्यविक्रीचे दुकान होते. तेथील नशेखोरांना वैतागून या विद्यार्थ्याने न्यायालयात धाव घेतल्याची घटना घडली आहे.
Crime News
Crime NewsYandex
Published On

Kanpur Crime Liquor Shop Near School

शाळा परिसरात मद्यविक्रीस मनाई आहे. परंतु अनेकदा खुलेआम मद्यविक्री होताना दिसते. कायद्याचं उल्लंघन ही काही नविन गोष्ट नाही, अशीच एक घटना कानपूरमधून (Kanpur Crime) समोर आली आहे. नशेखोरांना वैतागून बालवडीच्या विद्यार्थ्यानं न्यायालयात धाव घेतल्याची घटना घडली आहे, आपण हे प्रकरण सविस्तर जाणून घेऊ या.  (Latest Crime News)

कानपूरच्या आझाद नगरमध्ये एक शाळा आहे. तिथे अनेक निरागस मूलं शिकतात. त्यांच्या शाळेजवळ एक मद्यविक्रीचं दुकान आहे. तेथील दुकानदार सकाळी ७ वाजल्यापासून मद्यविक्री सुरू (Liquor Shop Near School) करतात. फूटपाथवर बसून लोकं खुलेआम मद्य पितात, तर नियमानुसार शाळांजवळील मद्यविक्रीची दुकानं बेकायदेशीर आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

काय आहे प्रकरण

कायद्याकडे दुर्लक्ष करून उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये मद्यविक्री केली जात आहे, परंतु संबंधित विभागाने या विषयावक मौन बाळगले आहे. पण एका एलकेजीच्या मुलाने याला विरोध केला (LKG Student Reached Court) आहे. शाळेजवळ मद्यविक्री सुरू असल्याचं पाहून त्यानी प्रथम कुटुंबीयांची आणि नंतर आजूबाजूच्या लोकांकडे चौकशी केली. मुलाच्या प्रश्नाने सगळेच थक्क झाले. आता वकिलामार्फत एलकेजीच्या विद्यार्थ्याने उच्च न्यायालयात ही दुकानं बंद करण्याची विनंती केली आहे.

सकाळपासून सायंकाळपर्यंत या मुलाच्या शाळेजवळ उघडलेल्या मद्यविक्रीच्या दुकानात ((Liquor Shop) मद्यविक्री व पिणाऱ्यांची गर्दी असते. हे पाहून त्या निरागस मुलाने शाळेत जाताना वडिलांना विचारले, इथे एवढी गर्दी का आहे, हे लोक काय पीत आहेत? असा सवालही या मुलाने घरी आल्यानंतर शेजाऱ्यांनाही विचारला. त्यानंतर त्याच्या वडिलांनी शाळा व्यवस्थापनाकडे तक्रार (Crime News)केली, मात्र कोणतीही सुनावणी झाली नाही. त्यानंतर त्यांनी IGRS पोर्टलवर तक्रार दाखल केली. तिथूनही त्याला मदत मिळू शकली नाही.

Crime News
Crime News: तरूणीने एकतर्फी प्रेमातून केलं टीव्ही अॅंकरच अपहरण; हैदराबादमधील खळबळजनक घटना

न्यायालयात सुनावणी होणार

यानंतर या मुलाच्या वडिलांनी उच्च न्यायालयातील मित्र वकिलाची भेट घेतली. मुलाशी पूर्ण संभाषण झाल्यानंतर त्यांनी याप्रकरणी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल (Marathi crime news) केली. याचिकेत राज्य सरकार, उत्पादन शुल्क आयुक्त, जिल्हा अधिकारी, जिल्हा उत्पादन शुल्क अधिकारी आणि मद्यविक्री परवानाधारक ज्ञानेंद्र कुमार यांना पक्षकार करण्यात आलं आहे.

नियमानुसार शाळांजवळील मद्यची दुकाने बेकायदेशीर (Liquor Shop) आहेत. शाळेपासून मद्यविक्रीचे अंतर केवळ ३० मीटर आहे, तर नियमानुसार ५० मीटरच्या आत अशा दुकानांना परवाना दिला जात नाही.या याचिकेवर आता पुढील सुनावणी 13 मार्च रोजी होणार आहे.

Crime News
Nagpur Crime News: भयंकर! डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमादिवशीच पतीची हत्या; नागपूर हादरलं

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com